रणदीप सावरकर यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) चित्रपटाने वीर सावरकर यांच्या जीवनपटावर आणि खऱ्या इतिहासावर प्रकाश पडला आहे. त्यामुळे अनेकांचा जळफळाट होत आहे. नुकतेच हा मराठी भाषेतील चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मराठी भाषेतील चित्रपट पाहिल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आव्हान दिले होते की, ते चित्रपट पहाणार असतील, तर मी संपूर्ण थिएटर बूक करीन. फडणवीसांच्या आव्हानानंतर राहुल यांची भलावण करण्यासाठी उबाठाचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना टारगेट केले होते. त्यांच्या पाठोपाठ आता नाना पटोले यांनीही सावरकर चित्रपटाचा विषय बाजूला ठेवून टीका-टिप्पणी केली आहे.
म्हणे, सावरकर चित्रपटही फ्लॉप झाला आहे
मोदींवरचा सिनेमा फ्लॉप झाला. नितीन गडकरींवरील हायवे मॅन सिनेमा फ्लॉप झाला. गोडसेवरील चित्रपट फ्लॉप झाला आणि सावरकर चित्रपटही फ्लॉप झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पाहावा, गांधी विचारासाठी फडणवीसांनी हा चित्रपट पाहायला हवा त्यांच्यासाठी थिएटर बुक करतो, अशी टीका कॉंग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने व वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदिश माळी यांनी समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे तानाशाही सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी, तसेच लोकशाही व्यवस्था व संविधान टिकवण्यासाठी हा लढा सुरु आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भिती दाखवून भाजपा दुसऱ्या पक्षातील लोकांना पक्षात प्रवेश देते पण त्याचाही काही फरक पडत नाही, असे ते पुढे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community