लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. दिल्लीत सोमवारपासून एलपीजी सिलिंडरचे दर ३०.५० रुपयांनी कमी झाले आहेत. एलपीजी सिलिंडर कोलकात्यात ३२ रुपयांनी , तर मुंबईत ३१.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे.
एप्रिल महिन्याच्या १ तारखेपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते. त्यामुळे सोमवार, १ एप्रिलपासनच घरगुती सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीत एलपीजी सिलिंडरचे दर ३०.५० रुपयांनी कमी झाले आहेत. एलपीजी सिलिंडर कोलकात्यात ३२ रुपयांनी, मुंबईत ३१.५० रुपयांनी कमी झाले आहेत. ही कपात केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या बाबतीत लागू करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात घरगुती सिलिंडरच्या बाबतीत कोणताही बदल झालेला नाही.
(हेही वाचा – Summer Camps: मुलांमध्ये कौशल्य निर्माण करणारे संस्कार वर्ग आणि शिबिरे)
घरगुती सिलिंडरच्या किमतीत बदल नाही…
याविषयी सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिलपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ३०.५० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे, मात्र या कपातीचा लाभ केवळ १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरच मिळणार आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community