महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत सोमवारी, (१ एप्रिल) पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह देशात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणात पावसाने अचानक हजेरी लावल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. (Weather forecast)
पुढील २४ तासांत राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – LPG Cylinder: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा, LPG सिलिंडर ३२ रुपयांनी स्वस्त)
हवामान विभागाने वर्तवलेल्या माहितीनुसार, (Weather forecast) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने येण्याची शक्यता आहे.
काही भागांत अतिवृष्टीची शक्यता…
पुढील 24 तासात आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पाऊसासह काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून जम्मू-काश्मीर-लडाखमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30 -40 किमी प्रतितास वेगाने येण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Communityतपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट द्यI pic.twitter.com/bZI7QVQLsa
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 31, 2024