पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील जलपाईगुडी जिल्ह्याच्या (West Bengal Cyclone) काही भागांत अचानक आलेल्या वादळामुळं ५ जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जखमी झाले. या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जिल्हा मुख्यालय शहराच्या बहुतांश भागात आणि शेजारच्या मैनागुरीच्या अनेक भागात गारपिटीसह जोरदार वाऱ्यामुळं अनेक झोपड्या आणि घरांचं नुकसान झालं, झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांब कोसळले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जलपाईगुडी येथील रुग्णालयात चक्रीवादळग्रस्तांची भेट घेतली.
WB CM Mamata Banerjee meets cyclone victims at hospital in Jalpaiguri
Read @ANI Story | https://t.co/krsh1Og4NC#BengalCylone #Jalpaiguri #MamataBanerjee pic.twitter.com/ld6IjnglPF
— ANI Digital (@ani_digital) March 31, 2024
जिल्हा मुख्यालय शहर आणि शेजारच्या मैनागुडीच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, झोपड्या आणि घरांचे नुकसान झाले, झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांब उन्मळून पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वादळामुळे राजारहाट, वार्निश, बकाली, जोरपाकडी, माधबडांगा आणि सप्तीबारी या भागांना सर्वाधिक फटका बसला असून अनेक एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. डिजेंद्र नारायण सरकार (52), अनिमा बर्मन (45), जगन रॉय (72) आणि समर रॉय (64) अशी मृतांची नावे आहेत.
(हेही वाचा – Weather forecast: विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामानाचा अंदाज जाणून घ्या… )
जलपाईगुडी जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गारपिटीमुळे अनेक पादचारी जखमी झाले आहेत. या भागात आपत्कालिन मदत पथके तैनात करण्यात आली आहेत आणि मदत केंद्रेही उभारण्यात आली आहेत. धुपगुडीचे आमदार निर्मल चंद्र रॉय यांनी माध्यमांना सांगितले की, अनेक लोकांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस हे देखील सोमवारी जलपाईगुडी येथे पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी रवाना होतील, असे राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जलपाईगुडीतील परिस्थिती हाताळण्यासाठी राजभवन येथे आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. मदतकार्यासाठी नागरी प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community