महावितरणने ग्राहकांना वीजदरवाढीचा झटका दिला आहे. सोमवार, (१ एप्रिल) पासून वीजबिलात सरासरी ७.५० टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नवे दर लागू होणार आहेत.
नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून नवीन वीज दर लागू करण्यात आले आहेत. महावितरणकडून वीजबिलात सरासरी ७.५० टक्क्यांची वाढ होणार आहे. स्थिर आकारातही १० टक्के वाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणने केलेल्या वीज दरवाढीमुळे वीजबिलात किमान ५० रुपयांची वाढ होणार आहे.
(हेही वाचा – Gopinath Bordoloi International Airport: मुसळधार पावसामुळे गुवाहाटीतील विमानतळाचे छत अचानक कोसळले )