- ऋजुता लुकतुके
आयपीएलमध्ये रविवारी संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (IPL 2024, CSK vs DC) यांच्यातील सामना रंगतदार झाला. तो अखेर दिल्ली कॅपिटल्सनी (DC) जिंकला. दिल्लीने प्रथम खेळताना १९१ धावा केल्या होत्या, पण चेन्नईला २० षटकांत केवळ १७१ धावा करता आल्या आणि २० धावांनी त्यांचा पराभव झाला. (IPL 2024, CSK vs DC)
(हेही वाचा- Gopinath Bordoloi International Airport: मुसळधार पावसामुळे गुवाहाटीतील विमानतळाचे छत अचानक कोसळले)
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकांनी दिल्लीला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले आणि बाकीचे काम दिल्लीच्या गोलंदाजांनी केले. विशेषत: मुकेश कुमार आणि खलील अहमद यांनी चेन्नईच्या (CSK) फलंदाजीचे कंबरडे मोडले. दिल्लीकडून परभाव झाल्यामुळे चेन्नईला मोठे नुकसान झाले आहे. दिल्लीच्या विजयानंतर आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहे.(IPL 2024, CSK vs DC)
दिल्लीविरुद्ध सामना गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नई आणि केकेआरचे 4 गुण आहेत. मात्र नेट रनरेट्या जोरावर केकेआरने गुणतालिकेत मुसंडी मारली आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने (DC) यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला आणि 2 महत्त्वाचे गुण जमा केले. दिल्ली आता नवव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचली आहे. (IPL 2024, CSK vs DC)
(हेही वाचा- Electricity Rate Hike: वाढत्या तापमानाचा सर्वसामान्यांना फटका, महावितरणचे नवे दर लागू)
👀 A look at the points table after 1️⃣3️⃣ Matches 🙌
Which teams will eventually make the Top 4? 🤔#TATAIPL pic.twitter.com/hl1hK8iHDz
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2024
चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) पराभवामुळे, कोलकाता नाईट रायडर्स आता अव्वल स्थानी आला आहे. केकेआरचे सध्या 4 गुण आहेत आणि नेट रनरेट +1.047 आहे. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थानचे देखील 4 गुण आहेत. मात्र नेट रनरेट केकेआर पेक्षा कमी असल्यामुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 31 मार्च रोजी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव करून गुजरात टायटन्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आला आहे आणि त्यांचे आता 4 गुण झाले आहेत. (IPL 2024, CSK vs DC)
(हेही वाचा- Toll Rates : वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोल शुल्कात १८ टक्क्यांनी वाढ, ‘हे’ आहेत सुधारित दर)
हैदराबादचे सध्या 2 गुण आहेत आणि गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर त्यांचा संघ पाचव्या स्थानावर घसरला आहे. लखनौ सुपर जायंट्सचे देखील 2 गुण आहेत, जे सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, 2 सामन्यांत 2 पराभव पत्करून मुंबई इंडियन्सला अद्याप खातेही उघडता आलेले नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. (IPL 2024, CSK vs DC)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community