- ऋजुता लुकतुके
आयपीएलमध्ये गेल्या आठवड्यात एक पदार्पण चांगलंच गाजलं. लखनौ सुपरजायंट्सकडून (Lucknow Supergiants) २१ वर्षीय मयंक यादवने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात आपल्या संघाला या हंगामातील पहिला विजयही मिळवून दिला. पंजाब किंग्ज विरुद्ध ताशी १५५.८ किमी वेगाने त्याने टाकलेला चेंडू या हंगामातील आतापर्यंतचा सगळ्यात वेगवान चेंडू ठरला आहे. (IPL 2024, Mayank Yadav)
(हेही वाचा- IPL 2024, CSK vs DC : दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे चेन्नई सुपरकिंग्जचं मोठं नुकसान )
सलामीवीर क्विंटन डिकॉकचे (Quinton De Kock) अर्धशतक, निकोलस पूरन (Nicholas Pooran), कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांची मोलाची खेळी आणि त्यानंतर मयांक यादव व मोहसीन खान यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर लखनौ संघाने आयपीएल २०२४ मध्ये शनिवारी पंजाब संघावर २१ धावांनी शानदार विजय मिळवला. लखनौचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांत ८ बाद १९९ धावा केल्या. पंजाबला २० षटकांत ५ बाद १७८ धावांवर रोखून लखनौ संघाने विजय मिळवला. (IPL 2024, Mayank Yadav)
लखनौ संघाकडून (Lucknow Supergiants) आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या मयंक यादवने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सर्वांना प्रभावित केले. मयंक यादनवे आपल्या पदापर्णाच्या सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकत साऱ्यांना अवाक् केले. त्याशिवाय पहिल्याच सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला. मयंकने यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वात जलद (१५५.८ प्रति ताशी वेग) चेंडू टाकला. मयंकने पंजाबविरुद्धच्या सामन्यात १५६, १५०, १४२, १४४, १५३ आणि १४९ च्या प्रति ताशी वेगाने गोलंदाजी केली. (IPL 2024, Mayank Yadav)
𝗦𝗽𝗲𝗲𝗱𝗼𝗺𝗲𝘁𝗲𝗿 goes 🔥
𝟭𝟱𝟱.𝟴 𝗸𝗺𝘀/𝗵𝗿 by Mayank Yadav 🥵
Relishing the raw and exciting pace of the debutant who now has 2️⃣ wickets to his name 🫡#PBKS require 71 from 36 delivers
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL |… pic.twitter.com/rELovBTYMz
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2024
IPL 2024 मध्ये जलद गतीने चेंडू टाकणारे गोलंदाज
मयंक यादव – १५५.८ प्रति ताशी वेग
नंद्रे बर्गर – १५३ प्रति ताशी वेग
गेराल्ड कोएत्झे – १५२.३ प्रति ताशी वेग
अल्झारी जोसेफ – १५१.२ प्रति ताशी वेग
मथीक्क्षा पथिराना – १५०.९ प्रति ताशी वेग
MAYANK YADAV THE 21 YEAR OLD DEBUTANT HAS CLOCKED THE FASTEST BALL OF IPL 2024….!!!! 🤯 pic.twitter.com/oAAlwnRiBW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 30, 2024
(हेही वाचा- IPL 2024, SRH vs GT : गुजरात टायटन्सची हैदराबादवर ७ गडी राखून मात)
IPL इतिहासात जलद गतीने चेंडू टाकणारे गोलंदाज
शॉन टेट – १५७.७१ प्रति ताशी वेग
लॉकी फर्ग्युसन – १५७.३ प्रति ताशी वेग
उमरान मलिक – १५७ प्रति ताशी वेग
एनरिक नॉर्खिया – १५६.२ प्रति ताशी वेग
मयंक यादव – १५५.८ प्रति ताशी वेग
मयंकची एकूण कामगिरी चांगली झाली आहे. त्याने ११ टी-20 सामन्यात १५ विकेट घेतल्या आहेत. या काळात एका सामन्यात २० धावांत ३ बळी घेणे ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मयंकने १७ लिस्ट ए सामन्यांमध्ये ३४ विकेट घेतल्या आहेत. त्याने एक प्रथम श्रेणी सामनाही खेळला आहे. यामध्ये २ बळी घेतले. मयंकने लिस्ट ए मॅचमध्ये जम्मू-काश्मीरविरुद्ध ३ विकेट घेतल्या होत्या. नोव्हेंबर २०२३ मध्ये अहमदाबादमध्ये हा सामना झाला होता. (IPL 2024, Mayank Yadav)