IPL 2024, CSK vs DC : धोनीच्या फलंदाजीने चाहते खुश, पत्नी साक्षीनेही लिहिली सुरेख पोस्ट 

IPL 2024, CSK vs DC : साक्षीने आपल्या पोस्टमध्ये रिषभ पंतचाही उल्लेख केला आहे 

199
IPL 2024, CSK vs DC : धोनीच्या फलंदाजीने चाहते खुश, पत्नी साक्षीनेही लिहिली सुरेख पोस्ट 
IPL 2024, CSK vs DC : धोनीच्या फलंदाजीने चाहते खुश, पत्नी साक्षीनेही लिहिली सुरेख पोस्ट 
  • ऋजुता लुकतुके

चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (IPL 2024, CSK vs DC) यांच्यात ३१ मार्च रोजी सामना झाला. या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा पराभव केला.  दिल्लीने प्रथम खेळताना १९१ धावा केल्या होत्या, पण चेन्नईला २० षटकांत केवळ १७१ धावा करता आल्या आणि २० धावांनी सामना गमवावा लागला. (IPL 2024, CSK vs DC)

(हेही वाचा- IPL 2024, SRH vs GT : गुजरात टायटन्सची हैदराबादवर ७ गडी राखून मात)

चेन्नईचा पराभव जरी झाला असला तरी मात्र चाहते एमएस धोनीची (MS Dhoni) खेळी पाहून खूप आनंदी आहेत. धोनीने (MS Dhoni) फलंदाजीसाठी येताच पहिल्या चेंडूवर चौकार मारून संघाच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. धोनीने १६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावांची नाबाद खेळी केली. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. (IPL 2024, CSK vs DC)

धोनीच्या (MS Dhoni) दिल्लीविरुद्धच्या आक्रमक खेळीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. याचदरम्यान धोनीची धडाकेबाज फलंदाजी पाहिल्यानंतर पत्नी साक्षीने (Saksi) सोशल मीडियाच्या माध्यमातून मजेशीर प्रतिक्रिया दिली. दिल्ली आणि चेन्नईच्या सामन्यानंतर साक्षीने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.’स्ट्रायकर ऑफ द मॅच’ पुरस्कार घेताना धोनीचा फोटो शेअर करत साक्षी म्हणाली की, सामन्यात आमचा पराभव झाला असं वाटलं नाही. तसेच साक्षीने रिषभ पंतलाही टॅग करत “Welcome Back Rishbh Pant” असं म्हटलं आहे. साक्षीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (IPL 2024, CSK vs DC)

(हेही वाचा- Swatantryaveer Savarkar : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमा पाहून अभिनेता प्रसाद ओक थक्क, इन्स्टा पोस्ट लिहून केलं कौतुक; म्हणाला…)

आजचा सामना गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची (CSK) गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नई आणि केकेआरचे ४ गुण आहेत. मात्र नेट रनरेट्या जोरावर केकेआरने गुणतालिकेत मुसंडी मारली आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला आणि २ महत्त्वाचे गुण जमा केले. दिल्ली आता नवव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचली आहे. (IPL 2024, CSK vs DC)

(हेही वाचा- IPL 2024, Mayank Yadav : १५५.८ किमी प्रतीतास वेगाने चेंडू फेकणारा मयंक इतके दिवस कुठे होता, सगळीकडे चर्चा?)

आयपीएल २०२४ च्या हंगामात आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा रंगतदार सामना होईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता मुंबई आणि राजस्थानचा सामना सुरु होईल. (IPL 2024, CSK vs DC)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.