NCP: राष्ट्रवादीने डावलले, वंचितने सावरले

261
NCP: राष्ट्रवादीने डावलले, वंचितने सावरले
NCP: राष्ट्रवादीने डावलले, वंचितने सावरले

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर (Ramesh Baraskar) यांना पक्षाने उमेदवारी डावलल्याने बारसकर यांनी वंचित बहुजन पक्षाचा (Vanchit Bahujan Aghadi) आधार घेत माढा (Madha) मतदार संघातून उमेदवारी मिळवली. ही उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी केली. (NCP)

(हेही वाचा- SBI Debit Card Charges: एसबीआय डेबिट कार्डच्या शुल्कात ७५ रुपयांची वाढ, ग्राहकांकडून आकारलेल्या विविध शुल्कांची यादी; वाचा सविस्तर)

महायुती उमेदवाराला लाभ  

बारसकर (Ramesh Baraskar) हे ओबीसी (माळी-लिंगायत) प्रवर्गात मोडत असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवारांच्या यादीत म्हटले आहे. माढा (Madha) मतदार संघात धनगर आणि अन्य ओबीसी समाजातील मते मोठ्या प्रमाणावर असून या मतांवर वंचित आघाडीचा डोळा आहे. उमेदवार निवडून आला नाही तरी किमान लाखाच्या वर तरी मते मिळविण्याचे ध्येय वंचितचे आहे. यामुळे महायुतीच्या उमेडवराला लाभ आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारला फटका बसण्याची शक्यता आहे. (NCP)

(हेही वाचा- Electricity Rate Hike: वाढत्या तापमानाचा सर्वसामान्यांना फटका, महावितरणचे नवे दर लागू)

‘मविआ’चा अद्याप उमेदवारीवर निर्णय नाही

महायुतीकडून माढाची उमेदवारी विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारीवरून अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला आणि फलटण, माण हे विधानसभा मतदार संघ मोडतात यातील पहिले चार मतदार संघ सोलापूर जिल्ह्यात येतात तर फलटण आणि माण हे सातारा जिल्ह्यात आहेत. (NCP)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.