IPL 2024 Hardik Pandya : हार्दिक पांड्याला ट्रोलिंग करणाऱ्यांना खरंच मुंबई पोलीस स्टेडिअम बाहेर काढणार?

IPL 2024 Hardik Pandya : सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

213
IPL Mega Auction : मुंबई इंडियन्स रोहित शर्माला डच्चू देणार?
  • ऋजुता लुकतुके

मुंबईचं कर्णधारपद २०१३ ते २०२३ पर्यंत रोहित शर्माकडे होतं. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर रोहित शर्माचे चाहते नाराज असल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या गेल्या दोन सामन्यातही हे दिसून आले. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला मैदानातील प्रेक्षकांकडून ट्रोल केले जात आहे. (IPL 2024 Hardik Pandya)

मुंबई इंडियन्सचे पुढील चार सामने मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. मात्र गेल्या दोन सामन्यांचा विचार करता वानखेडे मैदानावर रोहित शर्माच्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या सामन्यासाठी पोलीस आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था मैदानावर ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. तसेच हार्दिकला डिवचणाऱ्यांना मैदानाबाहेर काढणार असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र हे वृत्त मुंबई क्रिकेट असोशिएशनने खोडून काढले आहे. (IPL 2024 Hardik Pandya)

हार्दिक पांड्याला टार्गेट करणाऱ्या प्रेक्षकांना रोखण्यासाठी एमसीए अतिरिक्त पोलीस उभे करणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे एमसीएने स्पष्ट केले आहे. हार्दिकला नापसंती दर्शवणाऱ्या प्रेक्षकांना रोखण्यासाठी एमसीएने अधिक सुरक्षारक्षक नेमल्याचे वृत्त खोटे आहे. ही फक्त अफवा आहे. अशा कोणत्याही सूचना एमसीएकडून देण्यात आलेल्या नाहीत. एमसीए बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असल्याचे एमसीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (IPL 2024 Hardik Pandya)

मुंबईचे पुढील ४ सामने –

मुंबई विरूद्ध राजस्थान (१ एप्रिल २०२४)
मुंबई विरूद्ध दिल्ली (७ एप्रिल २०२४)
मुंबई विरूद्ध आरसीबी (११ एप्रिल २०२४)
मुंबई विरूद्ध चेन्नई (१४ एप्रिल २०२४)

(हेही वाचा – Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी)

जसप्रीत बुमराह गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा सर्वात यशस्वी बॉलर ठरला होता. हैदराबादच्या मॅचमध्ये बुमराहला पॉवर प्लेमध्ये केवळ एक ओव्हर देणयात आली. त्यानंतर जसप्रीत बुमराह थेट १२ व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. तोपर्यंत हैदराबादच्या १६० धावा झालेल्या होत्या. हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराहचा योग्य वापर करु शकला नाही, अशी टीका केली जात आहे. पहिल्या मॅचमध्ये स्वत: बॉलिंगची सुरुवात करणाऱ्या हार्दिकनं यावेळी नवख्या गोलदाजांवर सुरुवातीला बॉलिंग करण्याची धुरा सोपवली. हैदराबादचे खेळाडू या संधीची वाट पाहत होते, त्यांनी या संधीचा फायदा घेत २० ओव्हरमध्ये ३ बाद २७७ धावा केल्या. (IPL 2024 Hardik Pandya)

मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मुंबईचे चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या निर्णयांवर भाष्य केलं आहे. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानं हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी साधारण होती. मुंबईच्या इतर गोलदांजांना मार पडत असताना हार्दिक पांड्यानं जसप्रीत बुमराहला लवकर गोलंदाजी न देणं समजण्यापलीकडील आहे, असं इरफान पठाण म्हणाला. याशिवाय हार्दिकच्या बॅटिंगवर देखील इरफान पठाणनं प्रश्न उपस्थित केले आहेत. टीमचे इतर बॅटसमन २०० च्या स्ट्राइक रेटनं धावा करत असताना कॅप्टनचं स्ट्राइक रेट १२० असू शकत नाही, असं इरफान म्हणाला. (IPL 2024 Hardik Pandya)

दरम्यान, युसूफ पठाण म्हणाला सनरायजर्स हैदराबादनं ११ ओव्हर्समध्ये १६० हून अधिक धावा केल्या असताना हार्दिक पांड्यानं जसप्रीत बुमराहला एकच ओव्हर का दिली? तुमच्या बेस्ट बॉलरनं अशावेळी बॉलिंग करणं आवश्यक आहे. हा बॅड कॅप्टनसीचा प्रकार आहे, असं वाटत असल्याचं युसूफ पठाण म्हणाला. (IPL 2024 Hardik Pandya)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.