Economic Recession : पुढील वर्षी कुठल्या देशांत येणार मंदी? भारतात मंदी येणार का?

Economic Recession : फ्रँकलीन टेम्पलटन या जागतिक अर्थविषयक संस्थेनं मंदीवर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

524
Economic Recession : पुढील वर्षी कुठल्या देशांत येणार मंदी? भारतात मंदी येणार का?
  • ऋजुता लुकतुके

जगातील काही देश जागतिक मंदीच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र, अशा काळात भारत आर्थिक प्रगती करत आहे. अशातच एक नवीन अहवाल समोर आला आहे. या अहवालात भारताला शेवटचं स्थान मिळालं आहे. मात्र, ही निराशाजनक बातमी नसून, आनंदाची बाब आहे. फ्रँकलिन टेम्पलटने वर्ल्डवाईड रिसेशन प्रोबेबिलिटी नावाने एक अहवाल तयार केला आहे. यामध्ये कोणत्या देशात मंदीची शक्यता किती आहे? हे सांगण्यात आलं आहे. (Economic Recession)

पुढील वर्षात कोणत्या देशात मंदी येणार याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात भारताच्या समोर शून्य टक्के असे लिहण्यात आले आहे. तर अनेक विकसीत देशामध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. चिंताजनक स्थिती असलेल्या देशामध्ये अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांचा समावेश असल्याची माहिती अहवालात देण्यात आलीय. भारतासाठी पुढील काळ चांगला असल्याची माहिती या अहवालात देण्यात आलीय. भारतात कोणत्याही प्रकारे मंदी येण्याची शक्यता नसल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय. (Economic Recession)

(हेही वाचा – IPL 2024 Hardik Pandya : हार्दिक पांड्याला ट्रोलिंग करणाऱ्यांना खरंच मुंबई पोलीस स्टेडिअम बाहेर काढणार?)

कोणत्या देशात किती टक्के मंदीची शक्यता?

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या वर्षी अनेक देशात जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी जर्मनीत मंदी येण्याची ७३ टक्के शक्यता आहे. यानंतर इटलीमध्ये ६५ टक्के, तर युकेमध्ये ५३ टक्के मंदिची शक्यता आहे. न्यूझीलंड आणि कॅनडामध्ये ५०-५० टक्के, अमेरिकेत ४५ टक्के मंदीची शक्यता आहे. मेक्सिको २५ टक्के, स्वित्झर्लंडमध्ये २० टक्के, स्पेन, जपान, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये १५ टक्के मंदीची शक्यता असल्याची माहिती या अहवालात देण्यात आलीय. (Economic Recession)

भारतात शून्य टक्के मंदिची शक्यता असल्याचे सांगणयात आले आहे. तर इंडोनेशिया २ टक्के, सौदी अरेबिया १० टक्के आणि ब्राझील १० टक्के शक्यता वर्तवली आहे. इंडोनेशिया आणि ब्राझील या देशात वेगानं विकास होत असल्याचं चित्र दिसत आहे. (Economic Recession)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.