खरबूज उन्हाळ्यात खरबुजाचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसात तहान लागण्याचे प्रमाण वाढते. शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. या दिवसांत खरबूज खाल्ल्याने तहान भागते. या फळात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंटस् असतात तसेच जीवनसत्त्वांचे प्रमाणही जास्त असते. खरबुजाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन शीतलता मिळते.
द्राक्ष उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात द्राक्षांचा समावेश अवश्य करावा. द्राक्षे खाल्ल्याने लघवीच्या वेळी होणाऱ्या वेदना आणि जळजळ बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत ज्यांनो डोकेदुखीचा त्रास होतो, त्यांनी द्राक्ष खाल्ल्याने डोकेदुखीचे प्रमाण कमी होते. मन शांत राहते.