एकेकाळी ‘येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो…’, असे म्हणून भाषणाची सुरुवात करणारे आणि हिंदुत्वाचे राजकारण करणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर वेगळेच दृश्य पहायला मिळाले.
उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे काही जणांची भेट घेऊन त्यांच्या गाडीत बसण्यासाठी जातांना दिसत आहेत. या वेळी गर्दीतील काही जण त्यांना हार घालतात. त्यानंतर मोठ्याने घोषणा दिल्या जातात.
(हेही वाचा – Ashish Shelar : …शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावुन आले..!; ॲड. आशिष शेलार यांची उबाठावर टीका)
‘नारे तकदीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणा
या घोषणा ‘जय भवानी जय शिवराय’, ‘हर हर महादेव’ अशा नव्हत्या. या घोषणा होत्या ‘नारे तकदीर, अल्लाह हू अकबर’ अशा होत्या. यासोबतच ‘अल्ला हू अकबर’ (Allah Hu Akbar) नारे देणारा तो समाज पुढे ‘उद्धवसाब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशाही घोषणा देत आहे.
हा व्हिडिओ कोणत्या भागातील आणि कधी काढलेला आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी त्यामुळे सामाजिक माध्यमांत अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या व्हिडिओवर काही जण ‘जय भवानी जय शिवराय’पासून चालू झालेला उद्धव ठाकरे यांचा प्रवास ‘नारे तकदीर, अल्लाह हू अकबर’पर्यंत येऊन पोहोचला आहे, अशा प्रतिक्रिया देतांना दिसत आहेत.
आधीही बदलली होती भूमिका
यापूर्वीही उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांच्या विपरीत भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा सावरकरद्वेष सर्वश्रूत आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही त्यांना ‘नालायक’, असे म्हटले होते. आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी सावरकर चित्रपट पहाण्यासाठी मी थिएटर बूक करीन, असे आव्हान दिल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच प्रतिआव्हान दिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community