Shiv Sena शिंदे दक्षिण मुंबईसाठी का आग्रही?

मिलिंद यांचे वडील मुरली देवरा चार वेळा या मतदार संघातून निवडून आले असून मिलिंद यांनी २००४ आणि २००९ मध्ये या मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे.

234
Shiv Sena शिंदे दक्षिण मुंबईसाठी का आग्रही?

महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीमध्येही काही जागांवर अद्याप राजकीय पक्षांचे एकमत होत नाही. महायुतीमधील मुंबई दक्षिण हा त्यातील एक मतदार संघ असून या मतदार संघावर भाजपाने तसेच शिवसेना (शिंदे) यांनी दावा केला आहे. शिवसेनेचा या जागेवरील दावा एका राज्यसभा खासदारसाठी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Shiv Sena)

दक्षिण मुंबईचे प्रतिनिधित्व केले

हा खासदार दूसरा-तिसरा कुणी नसून, नुकताच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले मिलिंद देवरा आहेत. शिवसेना देवरा यांच्यासाठी दक्षिण मुंबईची मागणी करत असून या जागेवर ते निवडून येतील अशी खात्री शिवसेनेला असल्याचे सांगण्यात येते. मिलिंद यांचे वडील मुरली देवरा चार वेळा या मतदार संघातून निवडून आले असून मिलिंद यांनी २००४ आणि २००९ मध्ये या मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. (Shiv Sena)

(हेही वाचा – Crime : घरी ‘ईद’ साजरी करण्यासाठी गँगस्टर बचकानाची तुरुंगातून धडपड)

देवरा यांना पसंती

शिवसेनेकडून माजी नगरसेवक यशवंत जाधव यांचे नाव चर्चेत असले तरी सध्या ते भाजपाशी अधिक जवळ गेल्याचे सांगण्यात येते. तसेच देवरा आणि जाधव यांच्यात तुलना केली असता देवरा यांच्या नावाला पक्ष कार्यकर्त्यांकडून अधिक पसंती मिळत आहे. देवरा सध्या राज्यसभेवर खासदार असून तिकीट मिळाल्यास ते राजीनामा देऊन ही निवडणूक लढवतील, असे सूत्रांनी सांगितले. (Shiv Sena)

देवरा नावाला दिल्लीत वलय

देवरा यांनी यापूर्वी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच गेल्या २० वर्षांपासून देवरा राष्ट्रीय राजकारणात सक्रीय असून त्यांच्या नावाला त्यांचे वडील मुरली देवरा यांच्या कारकिर्दीचे आणि गांधी परिवाराशी असलेले जुने संबंध, याचे वलय असल्याने त्यांना दिल्लीत स्वतःची वेगळी ओळख करुन देण्याची गरज पडणार नाही. यशिवाय केंद्रीय राज्यमंत्री पदाचा अनुभवही देवरा यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे दक्षिण मुंबई मतदार संघासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येते. (Shiv Sena)

(हेही वाचा – Congress आपचा हिशेब चुकविण्याच्या मूडमध्ये; रॅलीतील Arvind Kejriwal यांच्या होर्डिंगवरून असंतोष)

काँग्रेस पदाधिकारी, व्यापारीही देवरा यांच्या पाठीशी

देवरा यांच्या पक्षाप्रवेशावेळी काँग्रेसचे १० माजी नगरसेवक (Corporators), २५ पदाधिकारी (Office bearers) आणि ४५०-५०० कार्यकर्ते सोबत होते. इतकेच नव्हे तर मुंबईच्या आर्थिक नाड्या नियंत्रणात ठेवणाऱ्या दक्षिण मुंबईतील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, म्हणजेच अगदी कपडा व्यापारी ते थेट हिरा व्यापारी शिवसेनेत आले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यांचे केले होते. (Shiv Sena)

‘कॉस्मोपोलिटन’ चेहरा

देवरा यांना शिवसेनेच्या निमित्ताने दिल्लीच्या राजकारणात अधिक सक्रीय होण्याची संधी मिळेल तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेला देवरा यांच्यासारखा ‘कॉस्मोपोलिटन’ चेहेरा दिल्लीच्या राजकारणासाठी मिळेल ज्याचा फायदा पक्ष वाढीसाठी होऊ शकेल, असे बोलले जात आहे. (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.