लोकसभा 2024 (Lok Sabha 2024) च्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी राज्यभरात मराठा आरक्षणासंदर्भात मोठं आंदोलन पुकारण्यात आले होतं. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांचे आंदोलन चालू होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात प्रचारासाठी गेलेले भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. (Pratap Patil Chikhalikar)
(हेही वाचा – Dhairyasheel Mane : … तोपर्यंत प्रचार करणार नाही; संजय पाटील धैर्यशील मानेंचा प्रचार केव्हा करणार ?)
प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण
दरम्यान, नांदेड लोकसभा (Nanded Lok Sabha) मतदारसंघासाठी उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील कोंढा गावात मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आले होते. या वेळी आंदोलकांनी ‘एक मराठा -लाख मराठा’ यासह विविध घोषणा दिल्या. (Pratap Patil Chikhalikar)
(हेही वाचा – Shiv Sena शिंदे दक्षिण मुंबईसाठी का आग्रही?)
आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध नेत्यांना गावात प्रवेश दिलेला नाही
सध्या कोणत्याही गावात नेत्यांना गावबंदी नाही; मात्र काही ठिकाणी मराठा आंदोलकांचा आक्रमक रोष पाहायला मिळतोय. मराठा आरक्षणामध्ये सगेसोयरे अंमलबजाणीसाठी मनोज जरांगे पाटील आजही आग्रही आहेत. याआधी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध नेत्यांना गावात प्रवेश दिलेला नाही. आता भाजपाचे खासदार अशोक चव्हाण (Ashokrao Chavan) यांना देखील गावात आल्यावर मराठा बांधवांनी संताप व्यक्त केला.तसेच पोलिसांच्या मध्यस्तीने चव्हाण यांची गाडी मराठा आंदोलकांच्या गराड्यातून बाहेर काढण्यात आली. त्यानंतरही आंदोलकांची घोषणाबाजी चालू होती. (Pratap Patil Chikhalikar)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community