North Mumbai Lok Sabha : उत्तर मुंबईत महाविकास आघाडीचा उमेदवार घोसाळकर कुटुंबातीलच? : प्रभागांपासून प्रचाराला सुरुवात

विनोद घोसाळकर यांना लोकसभेत पाठवून तेजस्वी घोसाळकर यांना दहिसर विधानसभा मतदार संघात उतरवायचे असा उबाठा शिवसेनेचा विचार आहे, पण विनोद घोसाळकर यांना तेजस्वी घोसाळकर यांना दिल्लीत पाठवून स्वत:ला दहिसरचा गड काबिज करायचा आहे.

201
North Mumbai Lok Sabha : उत्तर मुंबईत महाविकास आघाडीचा उमेदवार घोसाळकर कुटुंबातीलच? : प्रभागांपासून प्रचाराला सुरुवात

उत्तर मुंबई लोकसभा (North Mumbai Lok Sabha) मतदार संघातून महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेस पक्षाऐवजी शिवसेनेच उमेदवार देणार हे निश्चित झाले असून हा उमेदवार घोसाळकर कुटुंबापैंकीच असेल असे स्पष्ट संकेत दिल्याने हे कुटुंब आता निवडणूक प्रचाराच्या कामाला लागले आहे. मात्र, ही निवडणूक पक्षाचे उपनेते असलेल्या विनोद घोसाळकर यांनीच लढवावी अशी इच्छा शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे, मात्र विनोद घोसाळकर यांना आपल्या स्नुषा तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे. त्यामुळे निवडणुकीत कुणी उतरावे हा निर्णय आता सर्वस्वी घोसाळकर कुटुंबावरच सोडण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसरमधील प्रभागांमधील उबाठा शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. (North Mumbai Lok Sabha)

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून (North Mumbai Lok Sabha) भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पियुष गोयल यांच्या नावाची घोषणा केली आहे. गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कापून पियुष गोयल यांना उमेदवारी दिल्यामुळे थोडेसे मैदान मोकळे असल्याचे पाहून या मतदार संघातून उबाठा शिवसेनेने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येची सहानभूती मिळवण्यासाठी उबाठा शिवसेनेने माजी आमदार व माजी विभागप्रमुख तसेच पक्षाचे उपनेते असलेल्या विनोद घोसाळकर यांना उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. (North Mumbai Lok Sabha)

(हेही वाचा – Ramdas Athawale: भारत तोडोचं काम करणारे आता भारत जोडायला निघाले आहेत; रामदास आठवलेंची राहुल गांधींवर घणाघाती टीका)

तेजस्वी घोसाळकरांना ‘या’ मतदारसंघात उतरवायचे असा उबाठाचा विचार

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद घोसाळकर यांनी ही निवडणूक लढवावी अशी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. परंतु विनोद घोसाळकर यांना दिल्लीत जायचे नसल्याने तसेच संसदेतील कामकाजाच्या पठडीत तेजस्वी घोसाळकर याच योग्य उमेदवार आहे, असे विनोद घोसाळकर यांना वाटत असल्याने त्यांनी आपल्या स्नुषा तेजस्वी घोसाळकर यांचे नाव पुढे केले आहे. विनोद घोसाळकर यांना लोकसभेत पाठवून तेजस्वी घोसाळकर यांना दहिसर विधानसभा मतदार संघात उतरवायचे असा उबाठा शिवसेनेचा विचार आहे, पण विनोद घोसाळकर यांना तेजस्वी घोसाळकर यांना दिल्लीत पाठवून स्वत:ला दहिसरचा गड काबिज करायचा आहे. त्यामुळे दोघांपैंकी एकाला उमेदवार निश्चित करून आपण कामाला लागा अशाप्रकारच्या सुचना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्याने हे कुटुंब आता प्रचाराच्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे. (North Mumbai Lok Sabha)

यापूर्वी विभाग क्रमांम १ व २च्या उबाठा शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मालाडमधील सभागृहात घेतल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी स्वत:च्या प्रभाग क्रमांक १ व संजय घाडी हे नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभाग ७मधील उबाठा शिवसेनेच्या गटप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रचाराला सुरुवात करत त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे घोसाळकर यांच्या कुटुंबातील उमेदवार या मतदार संघातून उभे रहाणार असून तेजस्वी घोसाळकर कि विनोद घोसाळकर हे आता या कुटुंबालाच निश्चित करावे लागणार आहे. (North Mumbai Lok Sabha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.