बांगलादेशच्या अंतर्गत राजकारणात भारताच्या कथित हस्तक्षेपाला विरोध करण्यासाठी बीएनपीचा BoycottIndia ट्रेंड सुरू झाला आहे. यामध्ये भारताने बांगलादेशच्या निवडणुकीत गेल्या १५ वर्षांपासून हस्तक्षेप आणि प्रभाव पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये असेही म्हटले आहे की, भारताने श्रीलंकेला आर्थिक संकटाच्या वेळी कोणतीही मदत केली नव्हती. BoycottIndia ट्रेंडमुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. यावर्षी हसीना (Sheikh Hasina) यांनी पंतप्रधानपदी पाचव्यांदा शपथ घेतली आहे. एका वृत्तसंकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
(हेही वाचा– Ramdas Athawale: भारत तोडोचं काम करणारे आता भारत जोडायला निघाले आहेत; रामदास आठवलेंची राहुल गांधींवर घणाघाती टीका)
विरोधक भारतीय मसाल्यांशिवाय खाऊ शकतात का? – शेख हसीना
गेल्या आठवड्यात एका भाषणात शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाला भारतीय वस्तूंवर बहिष्कार घातल्याप्रकरणी सुनावले होते. ‘विरोधक भारतीय मसाल्यांशिवाय खाऊ शकतात का?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्या म्हणाल्या, “बीएनपीचे नेते भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा सल्ला देत आहेत. माझा प्रश्न आहे की, बहिष्कार घालणाऱ्या लोकांच्या पत्नींकडे किती भारतीय साड्या आहेत? ते त्यांच्या बायकांकडून साड्या घेऊन जाळत का नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या नेतृत्त्वाखाली बांगलादेशचे भारताबरोबर चांगले संबंध आहेत.
भारत बांगलादेशचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार – डॉ. महमूद
शेख हसीना यांचे सहकारी डॉ. महमूद यांनी बीएनपीच्या राजकीय भूमिकेवर टीका केली. या कृतींचा देशाला फायदा होत नाही. अशा मोहिमा चालवल्या जातात, तेव्हा देशाची प्रतिमा परदेशात खराब होते, असेही ते म्हणाले. अनेक उद्योगांमध्ये भारत बांगलादेशचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. कच्चा माल, यंत्रसामग्री आणि कृषी वस्तूंसह आवश्यक आयातीसाठी बांगलादेश भारतावर अवलंबून आहे. त्याच वेळी भारताला बांगलादेशातील वस्त्र, कापड आणि औषधांच्या निर्यातीतून फायदा होतो, असेही डॉ. महमूद यांनी सांगितले. (Sheikh Hasina)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community