Harindranath Chattopadhyay : ’रेल गाडी, रेल गाडी’ ही सुप्रसिद्ध कविता कुणी लिहिली माहिती आहे का ?

219
Harindranath Chattopadhyay : ’रेल गाडी, रेल गाडी’ ही सुप्रसिद्ध कविता कुणी लिहिली माहिती आहे का ?
Harindranath Chattopadhyay : ’रेल गाडी, रेल गाडी’ ही सुप्रसिद्ध कविता कुणी लिहिली माहिती आहे का ?

हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय (Harindranath Chattopadhyay) हे भारतीय इंग्रजी कवी, नाटककार, अभिनेता आणि संगीतकार होते. ते विजयवाडा मतदारसंघातून पहिल्या लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे ते सरोजिनी नायडू यांचे धाकटे बंधू होते. भारत सरकारने त्यांना १९७३ मध्ये पद्मभूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.

(हेही वाचा – Ramdas Athawale: भारत तोडोचं काम करणारे आता भारत जोडायला निघाले आहेत; रामदास आठवलेंची राहुल गांधींवर घणाघाती टीका)

भारतीय संस्कृती आणि वैदिक विचारांशी संबंधित लेखन

हरिंद्रनाथ यांचा जन्म २ एप्रिल १८९८ मध्ये हैदराबाद येथे झाला. हरिंद्रनाथ हे कवी आणि गायक होते. त्यांची आई देखील कवयित्री होती आणि बंगालीत कविता लिहायची. हरिंद्रनाथ १९ वर्षांचे असतानाच त्यांचे पहिले कवितांचे पुस्तक, ’द फेस्ट ऑफ यूथ’ प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे या पुस्तकासाठी आर्थर क्विलर-काउच आणि जेम्स हेन्री कजिन्स यांनी प्रशंसा केली होती. त्यांनी इंग्रजीत प्राचीन भारतीय संस्कृती आणि वैदिक विचारांशी संबंधित विषयांवर लेखन केले.

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

१९७३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी आकाशवाणीवर त्यांची रेल गाडी ही कविता अनेकदा म्हटली आहे. हे गाणे अशोक कुमार यांनी आशीर्वाद चित्रपटात गायले होते. हरिंद्रनाथ यांनी अनेक गीते लिहिली, संगीत दिले आणि काही गाणी गायली. ’माय हार्ट बीटिंग’ हे ज्युली चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेलं इंग्रजी गाण खूप गाजलं. तसेच त्यांनी लहान मुलांसाठी हिंदीतही अनेक कविता लिहिल्या. त्यांच्या कवितांना नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी दाद दिली होती.

त्यांनी १९८४ मध्ये मुंबई दूरदर्शन टीव्ही मालिका ’अडोस पडोस’ मध्ये देखील काम केले होते. १९५१ च्या लोकसभा निवडणुकीत हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय मद्रास राज्यातील विजयवाडा लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे समर्थित स्वतंत्र उमेदवार म्हणून विजयी झाले. १४ एप्रिल १९५२ ते ४ एप्रिल १९५७ पर्यंत ते पहिल्या लोकसभेचे सदस्य होते. २३ जून १९९० रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. (Harindranath Chattopadhyay)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.