काँग्रेस खासदार राहुल गांधींनी रविवारी दिल्लीत झालेल्या सभेत भाजपवर सत्तेचे मॅच फिक्सींग आणि ईव्हीएम हॅकिंगसारखे (EVM Hacking) आरोप केले होते. याप्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपने आज, सोमवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय.
(हेही वाचा – ‘Book My Show’ची बनावट वेबसाईट तयार करून क्रिकेट सामन्याची तिकीटविक्री)
१८० चा टप्पाही पार करू शकणार नाहीत.
दिल्लीच्या रामलीला मैदानात (Delhi RamLeela Maidan) रविवारी झालेल्या सभेत राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केला होता. तसेच, भाजप त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झाला, तर देशाची घटना बदलली जाईल आणि लोकांचे अधिकार नष्ट होतील. ही मॅच फिक्सिंग (Match Fixing) थांबवण्यासाठी संपूर्ण ताकदीने मतदान करण्याचे आवाहनदेखील राहुल यांनी केले होते. मॅच फिक्सिंगशिवाय, ईव्हीएम (EVM Hacking) शिवाय, सोशल मीडिया (Social Media) आणि प्रेसवर दबाव आणल्याशिवाय ते १८० चा टप्पाही पार करू शकणार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला होता.
(हेही वाचा – North Mumbai Lok Sabha : उत्तर मुंबईत महाविकास आघाडीचा उमेदवार घोसाळकर कुटुंबातीलच? : प्रभागांपासून प्रचाराला सुरुवात)
पाकिस्तानच्या ताब्यात देण्यास काँग्रेसने मागेपुढे पाहिले नाही.
राहुल यांच्या आरोपावर पलटवार करताना भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला (Shehzad Poonawalla) म्हणावे की, पूर्वीच्या काँग्रेस सरकारने त्यांच्या प्रमुख कुटुंबाला फायदा मिळवून देण्यासाठी श्रीलंकेशी करार केला आणि आपले कच्चातीवू बेट त्यांना देऊन टाकले. फूट पाडणारे राजकारण काँग्रेसच्या ‘डीएनए’मध्ये आहे. १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करून जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात देण्यास काँग्रेसने मागेपुढे पाहिले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community