Shiv Sena : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या विभागप्रमुखाचा राजीनामा

दक्षिण मध्य मुंबईतील धारावी, वडाळा आणि माहीम-दादर या तिन्ही विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर या तिन्ही विधानसभा मतदार संघाची संघटनात्मक बांधणी करणाऱ्या विभागप्रमुखाला बाजुला करून त्या जागी नवीन विभागप्रमुख नेमणे हे आव्हान आहे.

384
निवडणुकांच्या तोंडावर Shiv Sena पदाधिकाऱ्यांना लॉटरी; 'या' सदस्यांची नियुक्ती

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले असतानाच शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे माहिम-दादर, धारावी आणि वडाळा विधानसभा क्षेत्राचे विभागप्रमुख गिरीश धानुरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी निशिकांत पाठारे यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर धानुरकर यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे. आमदार सदा सरवणकर यांच्याशी पटत नसल्याने धानुरकर यांनी राजीनामा दिला असल्याने पक्षाने निशिकांत पाठारे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पाठारे आता संघटनात्मक बांधणीमध्ये कसे काय काम करतात याकडे सर्वच शिवसैनिकांचे लक्ष आहे. (Shiv Sena)

गिरीश धानुरकर यांनी पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला असून त्यात त्यांनी आपण विभागप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. त्यामुळे आपल्याला अन्य कुठल्याही पदाची जबाबदारी दिली जावी अशी त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. मात्र, हा राजीनामा देतानाच धानुरकर यांनी आमदार सदा सरवणकर आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यावर निशाणा साधला. खासदारांशी संपर्क न करणारे विभागप्रमुख त्यांना हवे आहे,असा उल्लेख त्यांनी या राजीनामा पत्रात केला आहे. (Shiv Sena)

(हेही वाचा – Sheikh Hasina : विरोधक भारतीय मसाल्यांशिवाय खाऊ शकतात का; Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधान संतप्त)

दक्षिण मध्य मुंबईतील धारावी, वडाळा आणि माहीम-दादर या तिन्ही विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर या तिन्ही विधानसभा मतदार संघाची संघटनात्मक बांधणी करणाऱ्या विभागप्रमुखाला बाजुला करून त्या जागी नवीन विभागप्रमुख नेमणे हे आव्हान आहे. धानुरकर हे पूर्वी मनसेचे विभागप्रमुख होते तसेच महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार बाजुला गेल्यानंतर आमदार सदा सरवणकर यांच्यासह धानुरकर हेही बाजुला झाले होते. त्यामुळे या विभागातील त्यांचा पुर्वानुभव लक्षात घेता पक्षाने त्यांची नियुक्ती विभागप्रमुखपदी केली होती. परंतु मागील काही महिन्यांपासून धानुरकर आणि आमदार सदा सरवणकर यांचे पटत नसल्याने पक्षातील वातावरण योग्य राहावे म्हणून धानुरकर यांना पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडला होता. तर धानुरकर यांनी आपण स्वत: हा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आधीच पक्षाची बांधणी योग्यप्रकारे होत नाही, त्यातच अंतर्गत कलद आणि वादावादी निर्माण झाल्याने पक्ष समोर एक मोठे आव्हानच बनले आहे. (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.