Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जनजागृतीवर भर : कचऱ्याच्या गाड्यांवरून करणार लोकांना आवाहन

पुढील महिन्यात सोमवारी २० मे २०२४ रोजी मुंबइ शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील मिळून सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका, मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडून समन्वयाने कामकाज सुरू आहे.

301
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जनजागृतीवर भर : कचऱ्याच्या गाड्यांवरून करणार लोकांना आवाहन

लोकसभेच्या यंदाच्या निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकूण सहा मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मुंबई महानगरपालिकेकडूनही प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दररोज कचरा संकलन करण्यासाठी महानगरपालिकेची वाहने मुख्य परिसरांसह गल्लीबोळात जातात. या वाहनांवरून सार्वजनिक उद्घोषणा करीत मतदानासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार असल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले. तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, बचत गटांमधील सदस्य, शिक्षकांनाही या जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Lok Sabha Election)

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच त्याअनुषंगाने आतापर्यंत झालेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी या बोलत होत्या. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत सह आयुक्त (निवडणूक) विजय बालमवार यांनी निवडणूक कामकाजाचे नियोजन आणि जनजागृतीसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना सादर केल्या. सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्तांचे कार्यालय) चंद्रशेखर चोरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी (मुंबई शहर) फरोग मुकादम, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी (मुंबई उपनगर) किरण महाजन यांच्यासह महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगिता हसनाळे, उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळ, उप आयुक्त (परिमंडळ ३) (अतिरिक्त कार्यभार) विश्वास मोटे, उप आयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उप आयुक्त (परिमंडळ ५) देवीदास क्षीरसागर, उप आयुक्त (परिमंडळ ६) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे, उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे, उप आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) (विशेष) किरण दिघावकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Lok Sabha Election)

पुढील महिन्यात सोमवारी २० मे २०२४ रोजी मुंबइ शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील मिळून सहा लोकसभा मतदारसंघांसाठी (Lok Sabha Election) मतदान होणार आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका, मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडून समन्वयाने कामकाज सुरू आहे. मागील वेळी म्हणजेच सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या मतदानापेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. मागील वेळी महानगरपालिका प्रभागनिहाय मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ६० टक्क्यांपेक्षा कमी होती, त्या प्रभागांतील टक्केवारी कशी वाढेल, यासाठी प्रशासनाचा आराखडा तयार करा, असे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – Shiv Sena : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या विभागप्रमुखाचा राजीनामा)

मतदानाची आठवण करून देण्यासाठी सातत्याने उद्घोषणा

जास्तीत जास्त मुंबईकरांनी सोमवारी २० मे २०२४ रोजी मतदान करावे, यासाठी ठिकठिकाणी जागजागृती फलक लावण्यात येणार आहेत. याशिवाय वृत्तपत्रांतून जाहिराती, नभोवाणी संदेश, भित्तीपत्रके, तसेच समाज माध्यमांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये याबाबत नियोजन करण्यात आले आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांनही जनजागृती मोहिमेत सहभाग करून घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच चित्रपटगृहे, नाट्यगृहांमध्येही जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. याचबरोबर बसस्थानक, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मतदानाची आठवण करून देण्यासाठी सातत्याने उद्घोषणा देण्यात येणार आहेत. (Lok Sabha Election)

सहा मतदारसंघांतील गृहनिर्माण संस्था, मोठ्या इमारती, व्यापारी संकूल, मंडई, चित्रपटगृहे, बाजारपेठ, नाट्यगृहे, मॉल, शाळा, महाविद्यालयांमध्ये निरनिराळ्या माध्यमातून जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालय, बेस्ट, रेल्वे, महानगरपालिका, मुंबई पोलीस अशा सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करून तसेच आपापल्या स्तरावर उपाययोजना करून जनजागृती करावी. मुंबईकरांनी देखील मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी याप्रसंगी केले. (Lok Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.