External Affairs Minister S. Jaishankar : नाव बदलून काहीही होणार नाही; परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी चीनला सुनावले खडेबोल

चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील ३० ठिकाणांच्या नवीन नावांची यादी जाहीर

202
External Affairs Minister S. Jaishankar : नाव बदलून काहीही होणार नाही; परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी चीनला सुनावले खडेबोल
External Affairs Minister S. Jaishankar : नाव बदलून काहीही होणार नाही; परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी चीनला सुनावले खडेबोल

भारत देशाच्या शेजारील चीन (China) देशाने पुन्हा कुरघोड्या करत वादाला सुरुवात केली आहे. यापूर्वीही चीन(China) आणि भारत (India) देशाच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमकी झाल्या आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) नुकतेच विविध ३० ठिकाणांच्या नवीन नावांची यादी जाहीर केली आहे. एका अहवालानुसार चीनने सर्व नावे चिनी अक्षरात दिले आहेत. यामध्ये चीनने पर्वत, नद्या आणि काही महत्त्वाच्या ठिकाणांना ही नावे दिलेली आहेत. (External Affairs Minister S. Jaishankar)

(हेही वाचा – Sheikh Hasina : विरोधक भारतीय मसाल्यांशिवाय खाऊ शकतात का; Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधान संतप्त)

चीनला सुनावले 

“मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का? अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक आहे. नाव बदलून काहीही होणार नाही. भारताचे सैन्य एलओसीवर तैनात आहे. ते त्यांचे काम योग्यरित्या करतील” असे खडे बोल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले आहेत. (External Affairs Minister S. Jaishankar)

हेही वाचा – Swatantra Veer Savarkar Movie : उद्धव ठाकरे आता काँग्रेसच्या दबावाला बळी पडू लागले?)

चीनने बनवली १० नावे

सोमवार, १ एप्रिल रोजी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चीनच्या सरकारी वृत्तपत्रानुसार, (China’s official newspaper) नागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशच्या भौगोलिक नावांची चौथी यादी प्रसिद्ध केली आहे, ज्याला ते झांगनान म्हणून ओळखतात. या प्रदेशातील सार्वजनिक वापरातील ३० अतिरिक्त नावे अधिकृतपणे वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. (External Affairs Minister S. Jaishankar)

यापूर्वी ही यादी कधी जाहीर झाली?

अहवालात म्हटले आहे की, चीन सरकारने एप्रिल २०२३ मध्ये तिबेटी (Tibetan) आणि पिनयिन (Pinyin) या चिनी वर्णांचा वापर करून प्रदेशातील ११ नावे अंतिम केली होती, जी तिसरी यादी होती. पहिली यादी २०१७ मध्ये आली होती, तर दुसरी २०२१ मध्ये प्रसिद्ध झाली होती. (External Affairs Minister S. Jaishankar)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.