Drugs : ‘हेरॉईन’सह उत्तराखंडचा सरफराज पोलिसांच्या जाळ्यात

सरफराज हा हेरॉईनची डिलिव्हरी करण्यासाठी माहीम परिसरात आला असता पोलिसांनी त्याला सापळा लावून अटक केली, त्याच्याकडून मिळून आलेला हेरॉईन या अमली पदार्थाची किंमत ५४ लाख रुपये असल्याची माहिती शाहू नगर पोलीस ठाण्याचे वपोनि. जितेंद्र कांबळे यांनी दिली.

473
Drugs : 'हेरॉईन'सह उत्तराखंडचा सरफराज पोलिसांच्या जाळ्यात

उत्तराखंड राज्यातील सरफराज अब्दुल मस्जिद अहमद या तरुणाला ५४ लाख रुपयांच्या ‘हेरॉईन’ या अमली पदार्थासह माहीम येथून अटक करण्यात आली आहे. हेरॉईनची डीलेव्हरी करण्यासाठी सरफराज हा माहीम येथे आला असता शाहू नगर पोलिसांनी त्याला अटक केली. शाहू नगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंध कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Drugs)

एकेकाळी मुंबईत शहरात हेरॉईन (ब्राऊन शुगर) या अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत होती. मात्र मागील काही वर्षांपासून अमली पदार्थामध्ये हेरॉईनची जागा मेफेड्रोन (MD) ने घेतली आहे. शहरातून गायब झालेला हेरॉईन हा अमली पदार्थ (Drugs) हळूहळू पुन्हा शहरात दाखल होत असल्याचे शाहू नगर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. शाहू नगर पोलीस ठाण्याचे दहशतवाद विरोधी सेलचे सपोनि. सतेज म्हस्के यांच्या पथकाने माहीम येथील सायन -माहीम लिंक रोड येथे खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून सरफराज अब्दुल मस्जिद अहमद (२६) या तरुणाला अटक करून त्याच्याकडून २७०ग्रॅम हेरॉईन (ब्राऊन शुगर) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. (Drugs)

(हेही वाचा – Vanita Raut : लोकसभा निवडणूक जिंकले, तर प्रत्येक गावात बिअर बार; चंद्रपूरच्या उमेदवाराचं वादग्रस्त आश्वासन)

सरफराज हा हेरॉईनची डिलिव्हरी करण्यासाठी माहीम परिसरात आला असता पोलिसांनी त्याला सापळा लावून अटक केली, त्याच्याकडून मिळून आलेला हेरॉईन या अमली पदार्थाची किंमत ५४ लाख रुपये असल्याची माहिती शाहू नगर पोलीस ठाण्याचे वपोनि. जितेंद्र कांबळे यांनी दिली. सरफराज हा मूळचा उत्तराखंड राज्यात राहणारा असून सध्या तो वसईतील नायगाव येथे एकटा राहण्यास असून वसईत यापूर्वी त्याच्यावर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सरफराज याने उत्तराखंड येथील एका डोंगराळ भागातून हेरॉइन आणून मुंबईत त्याचा पुरवठा करीत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.ही कारवाई शाहू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक. सतेश मस्के, रमेश चव्हाण, शरद आव्हाड पोलीस अंमलदार. इलग, सोनावणे, आहेर, गोडसे, सपाटे आणि आव्हाड या पथकाने केली. (Drugs)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.