काँग्रेसने तिची पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील अकोला आणि तेलंगाणातील वारंगळ येथील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसने अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. (Abhay Patil)
(हेही वाचा – Vanita Raut : लोकसभा निवडणूक जिंकले, तर प्रत्येक गावात बिअर बार; चंद्रपूरच्या उमेदवाराचं वादग्रस्त आश्वासन)
एकूण सात जागांवर पाठिंबा देण्याची तयारी
नागपूर आणि कोल्हापूर या दोन जागा सोडून काँग्रेसला (Congress) एकूण सात जागांवर पाठिंबा देण्याची तयारी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने केला आहे, अशी चर्चा चालू होती. प्रकाश आंबेडकर स्वत: अकोला लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत. अकोल्यात काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर झालेला नव्हता. त्यामुळे तेथ काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार, अशी चर्चा चालू होती. अकोल्यातील उमेदवारी काँग्रेस मागे घेईल, असे संकेतही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही दिले होते. आता काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्याच विरोधात उमेदवार दिल्याने पाठिंब्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (Abhay Patil)
(हेही वाचा – External Affairs Minister S. Jaishankar : नाव बदलून काहीही होणार नाही; परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी चीनला सुनावले खडेबोल)
काँग्रेसने वारंगळमधून कादियाम काव्या
अकोल्यासोबतच काँग्रेसने तेलंगणातील वारंगल मतदारसंघातील उमेदवारदेखील जाहीर केला आहे. काँग्रेसने वारंगळमधून कादियाम काव्या (Kadiyam Kavya) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Abhay Patil)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community