- ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्स संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. यावेळचा पराभव घरच्या मैदानावर झालेला आणि आधीच्या तुलनेत जास्त लाजिरवाणा होता. मुंबई इंडियन्सनी (MI) पहिल्या डावांत ९ बाद १२५ धावा केल्या. याला उत्तर देताना हे सोपं आव्हान राजस्थान रॉयल्सनी — चेंडू राखून पूर्ण केलं. मुंबईची सुरुवातच चांगली झाली नाही. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. (IPL 2024, MI vs RR )
(हेही वाचा- Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जनजागृतीवर भर : कचऱ्याच्या गाड्यांवरून करणार लोकांना आवाहन)
ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर रोहित यष्टीरक्षक संजू सॅमसनकडे झेल देऊन बाद झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलमध्ये १७व्यांदा शून्यात बाद झाला. एक नकोसा विक्रम रोहितच्या नावावर जमा झाला आहे. कारण, सर्वाधिक ‘डक’ त्याच्या नावावर जमा झाले आहेत. त्याच्या बरोबर इथं दिनेश कार्तिकही (Dinesh Karthik) आहे. (IPL 2024, MI vs RR )
राजस्थानचा ट्रेंट बोल्टने दोन लागोपाठच्या चेंडूंवर रोहीत आणि नमन धीर यांना बाद केलं. (IPL 2024, MI vs RR )
Making a habit 😎
𝗧𝘄𝗶𝗻 strikes for Tent Boult in the very first over 👏👏
Follow the Match ▶️ https://t.co/XL2RWMFLbE#TATAIPL | #MIvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/oQCPSfTHRd
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2024
रोहित शर्माचा मुंबई संघातील साथीदार पियुष चावलाही आयपीएलमध्ये डकवर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि रोहित शर्मा्च्या (Rohit Sharma) खालोखाल आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (१५), पियुष चावला, मनदीप सिंग आणि सुनील नरेनही या नकोशा यादीत आहेत. (IPL 2024, MI vs RR )
(हेही वाचा- Japan Earthquake: जपान पुन्हा एकदा जोरदार भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ६.१ रिश्टर स्केलचे झटके)
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज
दिनेश कार्तिक – १७
रोहित शर्मा – १७
ग्लेन मॅक्सवेल – १५
पियुष चावला – १५
मनदीप सिंग – १५
सुनील नरेन – १५
हेही पहा-
Join Our WhatsApp Community