विदर्भासह राज्यभरात एके ठिकाणी अवकाळी पाऊस , तर दुसरीकडे उकाड्यामुळे काहिली होत असल्याचे जाणवत आहे. वाढत्या उष्म्याचा फटका विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत जाणवत आहे, तर राज्यभरात सोमवार, (१ एप्रिल)पासून उष्णतेची लाट सक्रीय झाली आहे. आगामी ५ दिवसांत ही लाट अजून तीव्र होईल. कमाल तापमानाचा पारा २ ते ३ अंशांनी वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, हिमालयात नवा पश्चिमी चक्रवात (Western Disturbance) सक्रीय होत आहे. त्यामुळे राज्यात ५ ते ८ एप्रिलदरम्यान पावसाचा अंदाज आहे. एप्रिल महिना सुरू होताच राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट तीव्र होत आहे. मध्य भारतात कमाल तापमानाचा पारा आणखी २ ते ४ अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सोमवारी दिला आहे. दरम्यान, हिमालयात नवा पश्चिमी चक्रवात तयार होत असल्यामुळे ५ ते ७ एप्रिलदरम्यान हिमालय, पं. बंगाल, पूर्वोत्तर राज्ये, बिहार, उत्तर प्रदेशपर्यंत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही यादरम्यान मध्य महाराष्ट्र, विदर्भ अन् मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे.
पश्चिमी चक्रवात म्हणजे ?
वेस्टर्न डिस्टर्बन्स हे भूमध्यसागरीय प्रदेशात उद्भवणारे एक्स्ट्राट्रॉपिकल वादळ आहे. जे भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात अचानक हिवाळी पाऊस आणते, जे पूर्वेकडे बांगलादेश आणि दक्षिण पूर्व नेपाळच्या उत्तर भागापर्यंत पसरते. हे पश्चिमेकडील प्रदेशांद्वारे चालविल्या जाणारा नॉन-मान्सूनल पर्जन्यमान आहे.
(हेही पहा – Japan Earthquake: जपान पुन्हा एकदा जोरदार भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ६.१ रिश्टर स्केलचे झटके)
पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्र – 5 ते 7 एप्रिल
विदर्भ – 5 ते 7 एप्रिल
मराठवाडा – 5 ते 7 एप्रिल
हेही पहा –
Join Our WhatsApp Community