IPL 2024, MI vs RR : मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, गुण तालिकेतही तळाला 

IPL 2024, MI vs RR : मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावरील हा पराभव अधिक लाजिरवाणा ठरला 

162
IPL 2024, MI vs RR : मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, गुण तालिकेतही तळाला 
IPL 2024, MI vs RR : मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, गुण तालिकेतही तळाला 
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या सतराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा (RR) संघ छान जमून आलाय. संघांना लीगच्या तयारीसाठी वेळ नाही मिळाला. पण, राजस्थान संघ मात्र एका व्यूहरचनेसह स्पर्धेत उतरलेला दिसतोय. उलट मुंबईचा संघ अधिकाधिक रुळावरून घसरतोय. असे हे दोन संघ सोमवारी वानखेडे मैदानावर आमने सामने आले तेव्हा मुंबईला घरच्या मैदानाची फायदा करून घेता आला नाही. उलट आधीच्या दोन पराभवांच्या तुलनेत घरच्या मैदानावरील पराभव जास्त जिव्हारी लागणारा होता. राजस्थानने मुंबईचा अगदी आरामात ६ गडी राखून पराभव केला. (IPL 2024, MI vs RR)

(हेही वाचा- Department of Meteorology: राज्यभरात येत्या ५ दिवसांत उष्णतेची लाट वाढणार, हवामान विभागाचा अंदाज)

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) नाणेफेक जिंकल्यावर मुंबईला (MI) पहिली फलंदाजी दिली. सुरुवातीला खेळपट्टीकडून मिळणाऱ्या मदतीचा राजस्थानी गोलंदाजांनी अचूक फायदा उचलला. ट्रेंट ब्रिजने पहिल्या षटकात बळी मिळवण्याचा लौकिक या सामन्यातही कायम ठेवला. उलट पहिल्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि नमन धीर (Naman Dhir) या दोन मुंबईकरांना शून्यावर बाद केलं. या धक्क्यातून सावरलाच नाही. निर्धारित २० षटकांत मुंबईचा संघ फक्त ९ बाद १२५ धावा करू शकला. हार्दिक पांड्याच्या ३४ ही संघाची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या. त्या खालोखाल तिलक वर्माने ३२ धावा केल्या. बाकी सगळे एकेरी धावसंख्येवरच बाद झाले.  (IPL 2024, MI vs RR)

ट्रेंट ब्रिजने २२ धावांत ३ बळी मिळवले.

यानंतर राजस्थानसमोरचं आव्हान सोपं होतंच. यशस्वी जयसवाल (१०), संजू सॅमसन (१२) आणि जोस बटलर (१३) यांना ४३ धावांच्या आत बाद करून मुंबईनं थोडा प्रतिकार केला होता. आकाश मढवाल आणि मफाका यांनी हे बळी मिळवले. त्यानंतर मात्र फॉर्ममध्ये असलेला रियान पराग आणि रवीचंद्रन अश्विन यांनी चौथ्या गड्यासाठी ४३ धावांची भागिदारी करून राजस्थानचा डाव सावरला. संघाला विजयाच्या जवळही नेलं. रियान परागने स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झळकावलं. आता विराट कोहलीच्या बरोबरीने त्याने स्पर्धेत १८१ धावा केल्या आहेत. त्यामुळे ऑरेंज कॅपही त्याला विभागून मिळाली आहे. (IPL 2024, MI vs RR)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : जागावाटपावरून महायुती आणि आघाडीत वाद कायम…..!)

रियान ५३ धावांवर तर शुभम दुबे ८ धावांवर नाबाद राहिले. या विजयानंतर राजस्थानचा संघ ३ सामन्यांत ३ विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल तर मुंबईचा संघ सलग तीन पराभवांमुळे तळाच्या स्थानावर राहिला आहे. (IPL 2024, MI vs RR)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.