दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या (Delhi marathi prathisthan) वतीने मंगळवार, (२ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. महादेव रोडवरील फिल्म्स डिव्हिजन ऑडिटोरियम येथे हा चित्रपट दिल्लीकरांना पाहण्याची संधी मिळणार आहे. (Swatantra Veer Savarkar)
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महान देशभक्त वीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांचे प्रेरणादायी कार्य आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे तसेच त्यांचा पुसलेला खरा इतिहास जगभरातील इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि जिज्ञासूंना कळावा, याकरिता सुप्रसिद्ध अभिनेते रणदीप हुड्डा (Randeep hooda) यांनी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील वीर सावरकर यांची व्यक्तिरेखा हुड्डा यांनीच साकारली आहे तसेच चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. (Swatantra Veer Savarkar) अभिनेते रणदीप हुड्डा यांची या चित्रपटाच्या विशेष शोकरिता उपस्थिती लाभणार आहे.
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : निवडणुकांच्या रंगात रंगले अवघे विदर्भ; बड्या नेत्यांची रेलचेल)
दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार, (२ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता फिल्म्स डिव्हिजन ऑडिटोरियम, महादेव रोड, नवी दिल्ली येथे या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. देशाच्या एका महान सुपुत्राच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी दिल्लीकर कमालीचे उत्सुक आहेत. कुटुंबातील तरुण व लहान मुलांना सोबत घेऊन दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चित्रपटाच्या नोंदणीसाठी मिळत आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.(Swatantra Veer Savarkar)
विशेष सूचना – खाली दिलेल्या लिंकवर तुमचा प्रवेश बुक करा. मर्यादित जागेमुळे, तुमची जागा निश्चित करण्यासाठी तुमची सीट लवकर बुक करा.
https://delhimarathi.org/old/vsdmp/