Vistara Flight Cancellations: विस्तारा कंपनीची १००हून अधिक उड्डाणे रद्द, DGCAकडून मागवले दैनंदिन अहवाल

विमानतळावर ताटकळत बसावं लागल्याबद्दल प्रवाशांनी तक्रारीदेखील केल्या आहेत.

159
Vistara Flight Cancellations: विस्तारा कंपनीची १००हून अधिक उड्डाणे रद्द, DGCAकडून मागवले दैनंदिन अहवाल
Vistara Flight Cancellations: विस्तारा कंपनीची १००हून अधिक उड्डाणे रद्द, DGCAकडून मागवले दैनंदिन अहवाल

विस्तारा एअरलाइन्सने मंगळवारी, (२ एप्रिल) प्रमुख शहरांमधून निघणारी १०० पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली. वैमानिकांच्या कमतरतेमुळे कंपनीला ही उड्डाणे रद्द करावी लागली तसेच परिचालनविषयक समस्यांचा सामनाही करावा लागत असल्याची समस्याही कंपनीने दिलेल्या निवेदनात मांडली आहे. (Vistara Flight Cancellations)

पीटीआयने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामध्ये मुंबईहून 15, दिल्लीहून 12 आणि बेंगळुरूहून 11 उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विस्ताराची 50 उड्डाणं रद्द करण्यात आली होती, तर 160 उड्डाणं उशिराने झाल्याची माहिती मिळते आहे. विमानतळावर ताटकळत बसावं लागल्याबद्दल प्रवाशांनी तक्रारीदेखील केल्या आहेत. काही प्रवाशांनी आपल्याला झालेल्या विलंबाबद्दल विमान कंपनीवर टीकेची झोड उठवली होती. (Vistara Flight Cancellations)

(हेही वाचा – Novak Djokovic : नोवाक जोकोविच फेडररचा ‘हा’ विक्रम मागे टाकण्याच्या तयारीत)

विस्तारा कंपनीने सादर केलं निवेदन…
विस्तारा कंपनीने यासंदर्भातील निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांची अनुपलब्धता यासह विविध कारणांमुळे विमानं रद्द करावी लागल्यामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमा मागितली आहे. ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दलची कबुली देतानाच आणि प्रवाशांना योग्य सेवा कशी देऊ यासाठी चिंतादेखील करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रवाशांना अधिक उत्तम सोयी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.

विमानसेवा सुरळीत करण्यासाठी…
विमान कंपनीनं असंही म्हटलं आहे की, उपलब्ध वैमानिकांच्या संख्येनुसार विमानसेवा सुरळीत करण्यासाठी उड्डाणांची संख्या तात्पुरती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. B787-9 ड्रीमलाइनर आणि A321neo सारखी मोठी विमाने निवडक देशांतर्गत सेवेसाठी किंवा अधिक संख्येने ग्राहकांना सामावून घेण्यासाठी, शक्य असेल अशा ठिकाणी देण्यात आली आहेत. शिवाय, ग्राहकांना परतावा देत असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.