Lok Sabha Elections 2024 : एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार?; तावडेंना भेटल्याची चर्चा

ईडीने आमची मालमत्ता जप्त केली आहे. ती मुक्त करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. नव्या वकिलाची नियुक्ती करायची असल्याने मी दिल्लीत आलो होतो. त्यात भाजपा नेत्यांना भेटण्याचा आणि पक्ष प्रवेशाचा काही संबंध नाही, असे स्पष्ट मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

268
Lok Sabha Elections 2024 : एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार?; तावडेंना भेटल्याची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांची दिल्ली दरबारी भेट घेतली असल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. मात्र ही भेट नेमकी कुठे झाली हे कळू शकले नसले तरी खडसे भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. एकूणच या भेटीचा तपशील समजला नसला तरी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र खडसे यांनी आपण न्यायालयाच्या कामासाठी दिल्ली आल्याचे सांगितले. (Lok Sabha Elections 2024)

भाजपामध्ये (BJP) परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आठवडाभरात त्यांचा पक्षप्रवेश होईल, असे सांगण्यात येते आहे. ते रविवारी रात्री अचानक दिल्लीत आले होते. पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले आहे. खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना भाजपाने रावेरमधून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली, मात्र, आपण राष्ट्रवादीचाच प्रचार करणार, असे खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे सांगतात, प्रत्यक्षात रक्षा यांच्या प्रचारासाठी उघडपणे मैदानात येण्याची गरज खडसे यांना वाटते. त्यासाठी ‘घरवापसी’ करायची, असा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे हे खडसेंच्या प्रवेशासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे एप्रिल महिन्यात खडसे भाजपात येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. (Lok Sabha Elections 2024)

(हेही वाचा – Maharashtra Public Service Commission: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ८७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा)

कोर्टाच्या कामासाठी दिल्लीत

ईडीने आमची मालमत्ता जप्त केली आहे. ती मुक्त करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. नव्या वकिलाची नियुक्ती करायची असल्याने मी दिल्लीत आलो होतो. त्यात भाजपा (BJP) नेत्यांना भेटण्याचा आणि पक्ष प्रवेशाचा काही संबंध नाही, असे स्पष्ट मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. (Lok Sabha Elections 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.