Novak Djokovic : नोवाक जोकोविच फेडररचा ‘हा’ विक्रम मागे टाकण्याच्या तयारीत

Novak Djokovic : २४ पैकी १२ विजेतेपदं जोकोविचने तिशी उलटल्यानंतर मिळवली आहेत. 

170
Novak Djokovic : रॉजर फेडररचा विक्रम मोडल्यानंतर जोकोविचची दुखापतीमुळे फ्रेंच ओपनमधून माघार
  • ऋजुता लुकतुके

नोवाक जोकोविचने आतापर्यंत कारकीर्दीत २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदं मिळवली आहेत. आणि हा अर्थातच एक विक्रम आहे. त्याचबरोबर ४१९ आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल राहिलेला जोकोविच नवीन आठवड्यात आणखी एका विक्रमाची बरोबरी करण्याच्या वाटेवर आहे. येत्या रविवारी तो अव्वल स्थानावर आपला ४२० वा आठवडा सुरू करेल. आणि त्याचबरोबर तो वयाने सगळ्यात मोठा अव्वल खेळाडू असेल. या बाबतीत तो रॉजर फेडररला मागे टाकेल. फेडरर ३६ वर्षं ३२१ दिवसांचा असताना शेवटचा नंबर वन होता. (Novak Djokovic)

जोकोविचही आता वयाच्या चाळीशीकडे वाटचाल करत आहे. २२ मे २०१७ ला जोकोविच ३० वर्षांचा झाला. आणि त्यानंतर आतापर्यंत त्याने ३१ विजेतेपदं मिळवली आहेत. यातील १२ ग्रँडस्लॅम, ३१ एटीपी टूअर, १० एटीपी मास्टर्स आणि २ एटीपी फिनाले यांचा समावेश आहे. पुरुषांच्या टेनिसमध्ये राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच हे तिघे टेनिसमधील गोट म्हणजे सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू समजले जातात. (Novak Djokovic)

(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार?; तावडेंना भेटल्याची चर्चा)

या तिघांमध्ये फेडरर तसंच नदाल हे वयाच्या २२ व्या वर्षी जागतिक स्तरावर अव्वल झाले. तेच जोकोविचला इथपर्यंत पोहोचायला २४वं वर्ष लागलं. पण, त्यानंतर जोकोविचने जोरदार मुसंडी मारली आहे. अलीकडेच कार्लोस अल्काराझ वयाच्या १९व्या वर्षी अव्वल क्रमांकावर पोहोचला. पण, तो ही फार काळ जोकोविचसमोर फार काळ टिकला नाही. आता जोकोविचचा अव्वल स्थानावर ४१९ व्या आठवडा सुरू होत आहे. (Novak Djokovic)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.