Pune University : विद्यापीठातील लाचखोरी लाजिरवाणी; विद्यार्थी समितीचे कुलगुरूंना पत्र

171
Pune University मधील औषधी वनस्पती उद्यानात दुर्मिळ वनस्पतींची लागवड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न संशोधन केंद्रात प्रबंधासाठी लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. ही अत्यंत लाजिरवाणी व विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणारी घटना आहे. त्यांच्यावर तातडीने आळा घालावा, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने कुलगुरूंना केली आहे. या संदर्भात सत्यशोधन समिती स्थापन करावी, अशी मागणी केली आहे. (Pune University)

(हेही वाचा – PM Modi : सभेला आलेल्या जनतेची मागितली माफी; काय आहे कारण)

समितीने संशोधक विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कुलगुरूंना पत्र दिले. त्यात ते म्हणतात, ‘‘घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून स्वतंत्र सत्यशोधन समिती स्थापन करावी. सखोल चौकशीनंतर दोषींवर योग्य कारवाई करावी. अशा घटना पुढे घडणार नाहीत, म्हणून विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी निवृत्त वरिष्ठ प्राध्यापकांच्या नियंत्रणाखाली एक स्वतंत्र पीएच.डी. तक्रार निवारण केंद्राची व्यवस्था करावी. जेणेकरून संशोधक विद्यार्थी तक्रारी नोंदवू शकतील.’’ (Pune University)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.