Sri vs Ban, 2nd Test : एकाच चेंडूमागे बांगलादेशचे ५ क्षेत्ररक्षक धावतात तेव्हा…

Sri vs Ban, 2nd Test : चट्टोग्राम स्टेडिअमवर उपस्थित प्रेक्षकही हे चित्र पाहून स्वत:ला आवरू शकले नाहीत 

187
Sri vs Ban, 2nd Test : एकाच चेंडूमागे बांगलादेशचे ५ क्षेत्ररक्षक धावतात तेव्हा…
Sri vs Ban, 2nd Test : एकाच चेंडूमागे बांगलादेशचे ५ क्षेत्ररक्षक धावतात तेव्हा…
  • ऋजुता लुकतुके

एरवी गंभीरपणे सुरू असलेल्या खेळादरम्यानही अनेकदा मजेशीर असे प्रसंग समोर येतात. तसंच काहीसं श्रीलंका विरुद्ध बांगलादेश कसोटी (Sri vs Ban, 2nd Test) सामन्या दरम्यान झालं. चट्रोग्राम कसोटीत खेळ गांभीर्यानेच सुरू होता. पण, एक किस्सा असा घडला की, एक चेंडू सीमारेषेपार जाण्यापासून थांबवण्यासाठी चक्क ५ क्षेत्ररक्षक चेंडूमागे धावताना दिसले. त्यातून उपस्थित प्रेक्षकांमध्येही हशा पिकला. (Sri vs Ban, 2nd Test)

(हेही वाचा- Novak Djokovic : नोवाक जोकोविच फेडररचा ‘हा’ विक्रम मागे टाकण्याच्या तयारीत)

तो क्षण आला श्रीलंकेच्या दुसऱ्या डावातील २१व्या षटकांत. हसन महमूदच्या (Hassan Mahmood) चेंडूवर प्रबाथ जयसूर्याने (Jayasuriya) चेंडू कट करून गलीमधून धाडला. गलीच्या क्षेत्ररक्षकाला चकवल्यावर जे घडलं ते मजेशीर होतं. एकूण ५ फलंदाज अगदी स्लिपपासून तो चेंडू अडवण्यासाठी धावले. ते चित्र मैदानावर खूपच गंमतीशीर दिसत होतं. या पाच जणांमधील स्पर्धा अखेर पॉइंटवर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने जिंकली. निदान चेंडू सीमारेषेपार होता होता राहिला. (Sri vs Ban, 2nd Test)

(हेही वाचा- Viswanathan Anand : कँडिडेट्स कपसाठी विश्वनाथन आनंदचा युवा भारतीय बुद्धिबळपटूंना सल्ला)

आधीच हा कसोटी सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील द्वंद्वासारखा झाला आहे. दर दिवशी सामन्यात उतार चढाव दिसत आहेत. श्रीलंकेनं पहिल्या डावात ५३१ धावा करत या कसोटीवर वर्चस्व मिळवलं आहे. बांगलादेशचा पहिला डाव १७८ धावांत गुंडाळल्यामुळे त्यांना मोठी आघाडीही मिळाली आहे. पण, दुसऱ्या डावांत बांगलादेशच्या गोलंदाजांनी एक निकराचा प्रयत्न करत लंकेचे ६ फलंदाज शंभरच्या आत बाद केले आहेत. (Sri vs Ban, 2nd Test)

(हेही वाचा- IPL 2024 : कोलकाताचा १७ एप्रिलचा सामना पुढे ढकलणार की, जागा बदलणार?)

त्यामुळे कसोटीच्या शेवटच्या दिवसांत रंगत निर्माण झाली आहे. पण, श्रीलंकेकडे अजूनही साडेचारशे धावांची आघाडी आहे. (Sri vs Ban, 2nd Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.