Pune Sasoon Hospital : ICU मध्ये उंदीर चावल्याने तरुणाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक प्रकार

306
Pune Sasoon Hospital : ICU मध्ये उंदीर चावल्याने तरुणाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Sasoon Hospital : ICU मध्ये उंदीर चावल्याने तरुणाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्याच्या (Pune) ससून रुग्णालयात (Pune Sasoon Hospital) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उंदीर चावल्यामुळे रूग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. मृतदेह ताब्यात घेण्यास ही नातेवाईकांनी नकार दिला आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात (Pune Sasoon Hospital)ही घटना घडली आहे. यापूर्वी देखील ड्रग्स प्रकरणामुळे ससून रुग्णालय (Pune Sasoon Hospital) चर्चेत आले होते. याच रुग्णालयात सागर रेणोसे (वय 30 वर्षे) (Sagar Renose) नावाचा एक रुग्ण गेल्या दहा दिवसांपासून उपचार घेत होता. मात्र या ससूनमधील आयसीयू वॉर्डमध्ये त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असताना त्याला उंदीर चावला आणि त्याचा मृत्यू झाला, असल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे.

मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

रूग्णालयातून दिलेल्या अहवालात, रुग्णाला उंदीर चावल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर नातेवाईंकांनी रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत रुग्णालयावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा या मृत रुग्णाच्या नातेवाईंकांनी घेतला आहे. या प्रकारामुळे ससून रुग्णालयावर (Pune Sasoon Hospital) मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नेमकं काय घडलं ?

सागर रेणोसे (Sagar Renose) याचा पुण्यातील भोर तालुक्यात अपघात झाला होता. त्यानंतर त्याला 16 मार्चला त्याला ससून रुग्णालयात (Pune Sasoon Hospital) उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आय सी यूमध्ये त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र 26 मार्चला त्याची प्रकृती खालावत होती. त्यानंतर नेमकं काय झालं, याचा शोध घेतला असता. उंदीर चावल्याचं समोर आलं. हा प्रकार पाहून नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला. आय सी यु मध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला असल्याचे दिसले. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन आज सकाळी त्याचं निधन झालं. त्याचं निधन झाल्यावर नातेवाईकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला. याआधी डॅाक्टर उंदीर चावल्याने मृत्यू झाल्याचे मान्य करत नव्हते. मात्र, आता डॉक्टरांनी सागर रेणुसेच्या शरीरवर उंदीर चावल्याचे मान्य केलं आहे. (Pune Sasoon Hospital)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.