काँग्रेस नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam)यांनी एका वाहिनीला दिेलेल्या मुलाखतीत संजय राऊतांवर (Sanjay Raut)टीकास्त्र डागले आहे. राऊतांनी शिवसेना, राष्ट्रवादी संपवली आणि आता ते आमची काँग्रेसही (Congress)संपवत आहेत. असा दावा त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीमध्ये मतभेद सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसचे (Congress)संजय निरुपम (Sanjay Nirupam)यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. यावरूनच मविआतील वाद समोर येत आहेत. (Sanjay Nirupam)
(हेही वाचा- Pune Sasoon Hospital : ICU मध्ये उंदीर चावल्याने तरुणाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक प्रकार)
संजय राऊतांनी (Sanjay Raut)शिवसेना संपवली
संजय राऊतांनी (Sanjay Raut)शिवसेना संपवली, असं वाटतं का? या प्रश्नावर बोलताना संजय निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले, “संजय राऊतांनी स्वतःची शिवसेना संपवली, राष्ट्रवादी संपवली आणि आता ते आमची काँग्रेसही संपवत आहेत. ज्याप्रमाणे मुंबईत जोर देऊन सहा पैकी पाच जागा घेण्याचा हट्ट आणि महाराष्ट्रातील ४८ पैकी जास्तीत जास्त जागा घेण्याचा हट्ट त्यांनी केला. त्यांच्याकडे काही नाहीय. त्यांचे नेते पळाले, त्यांचे कार्यकर्ते पळाले. त्यांचे मतदार किती हेही माहीत नाही. तरीही जबरदस्ती करून ते आमच्याकडून जागा घेत आहेत. मी आज भाकित करून जातो की मुंबईमध्ये पाचच्या पाचही जागा शिवसेना गमावणार आहे.” (Sanjay Nirupam)
(हेही वाचा- Gopinath Munde : शरद पवार तुमच्यावर ही अशीच वेळ येणार; गोपीनाथ मुंडे यांचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल)
शिवसेना संपली आणि आता काँग्रेसही संपणार
“मी आव्हान देतो की ते एकही जागा जिंकणार नाहीत. जेव्हा पाच जागा पडणार तेव्हा शिवसेना संपली आणि काँग्रेसही (Congress)संपणार. कारण या पाच मतदारसंघातील कार्यकर्ता विखुरणार. वाटाघाटी बरोबरीचं झालं पाहिजे. आमचा प्रस्ताव होता की तीन तीन जागा घ्या. पण पाच जागा तुम्ही घेणार आणि एक आम्हाला देणार. मग आम्ही कार्यकर्त्यांना काय सांगणार? विदर्भात काँग्रेसची ताकद आहे, पण मुंबईत त्यांची ताकद नाही. ठाकरे गटाची सध्या काय ताकद आहे, हे कोणीही काही सांगू शकत नाही.” असा घणाघात संजय निरुपम (Sanjay Nirupam)यांनी उबाठा गटावर केला आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community