मनोज जरांगेंकडे Maratha समाजाची पाठ

जरांगे यांनी आयोजित केलेल्या सभांनाही लोक फिरकत नसून गेल्या काही दिवसांमध्ये आयोजित केलेल्या सभांना खुर्च्या रिकाम्या राहिल्याने आता सभा घेण्याची हिंमत जरांगे करणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता ‘सगेसोयरे जागे झाले आणि जरांगेचे विमान अंतरवालीतच आपटले’ अशी चर्चा समाजात होत आहे.

330
मनोज जरांगेंकडे Maratha समाजाची पाठ

मराठा समाजावरील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची जादू आता उतरली आहे. मराठा समाजाने जरांगेंकडे पाठ फिरवल्याचे उघड होताच जरांगे यांनी लोकसभा निवडणूक समाजाच्यावतीने न लढविण्याचा निर्णय घेतला. तशी कबुलीच जरांगे यांनी अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी दिली. (Maratha)

सर्वेनंतर घोषणा मागे घेण्याची नामुष्की

काही दिवसांपूर्वी जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मोठ्या तावात लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केला मात्र त्यावर समाजाकडून मते मागवून घेतली आणि या सर्वेनंतर आपलीच घोषणा मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. या सर्वेतून अपक्ष उमेदवार उभा करू नये असा सुर आळवण्यात आला असून समाजाचा या घोषणेला अजिबात पाठिंबा मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. (Maratha)

रिकाम्या खुर्च्या

अखेर निवडणुकीतून बाहेर राहण्याचा निर्णय जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतल्याने त्यांची हवा ओसरली. जरांगे यांनी आयोजित केलेल्या सभांनाही लोक फिरकत नसून गेल्या काही दिवसांमध्ये आयोजित केलेल्या सभांना खुर्च्या रिकाम्या राहिल्याने आता सभा घेण्याची हिंमत जरांगे करणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता ‘सगेसोयरे जागे झाले आणि जरांगेचे विमान अंतरवालीतच आपटले’ अशी चर्चा समाजात होत आहे. (Maratha)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : निवडणुकीसाठी प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा भाजपाचा निर्धार)

राजकीय टीका-टिप्पणी

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केल्याने समाजात रोष निर्माण झाला आहे. जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राजकीय टीका-टिप्पणी टाळावी तसेच महाविकास आघाडीची तळी उचलून भाजपा विरोधी भूमिका घेण्यामुळे समाज त्यांच्यापासून दुरावत गेला. आता जरांगे यांचे बिंग फुटले असून त्यांचा बोलावता धनी कोण? असा सवाल विचारला जात आहे. (Maratha)

ज्याला पाडायचे त्याला पाडा

सध्या जरांगे पाटील यांच्या सभांना उपस्थिती फारच रोडावलेली दिसत असल्यामुळे त्यांनी सभा घेण्याचा निर्णय रद्द केल्याचे चर्चा होत आहे. लोकसभेसाठी जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला कोणतेही आवाहन करण्याची हिम्मत न करता ज्याला पाडायचे त्याला पाडा किंवा कुणालाही मत द्या, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला. (Maratha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.