पेय उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागते. घशाला कोरड पडते. त्यामुळे या दिवसांत डाळिंबाचे सरबत, लिंबू सरबत, कोकम सरबत किंवा उसाच्या रसाचे सेवन करावे. नारळाचे पाणी पिणेही फायदशीर ठरते. यामुळे निर्जलीकरणाचा धोका टळतो. फक्त पाणी पिणार असला, तर पाण्यासोबत गुळाचे सेवन फायदेशीर ठरते. बाहेरून घरी गेल्यावर लगेचच पाणी पिऊ नका.
आहार या दिवसांत पचनशक्ती कमी होते. त्यामुळे रोजच्या आहारात पालेभाज्या, संत्र, टरबूज, नारळ, टोमॅटो ही पाण्याचे प्रमाण जास्त असलेली ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. उन्हाळ्यात शारीरिक उर्जा जास्त लागते. त्यामुळे पौष्टिक आणि पूरक आहाराचा समावेश करा तसेच उन्हाळ्यात बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स घेणे आवश्यक आहे.