Solapur मतदार संघात राष्ट्रवादीचा माजी आमदार AIMIM चा उमेदवार?

Congress ला मोठा फटका बसण्याची शक्यता, चौरंगी लढत. 

268
Solapur मतदार संघात राष्ट्रवादीचा माजी आमदार AIMIM चा उमेदवार?
  • सुजित महामुलकर

महाविकास आघाडीने सोलापूर लोकसभा मतदार संघातील माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्राणिती यांच्यासाठी केलेली मतांची गणिते फिसकटण्याचा पुरेपूर कार्यक्रम होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सोलापूरमधून असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएम (AIMIM) राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी आमदाराला उतरवण्याच्या तयारीत आहे. (Solapur)

‘वंचित’कडून राहुल गायकवाड

सोलापूर या अनुसूचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदार संघात महायुतीकडून भाजपाचे विद्यमान आमदार राम सातपुते हे उमेदवार असून काँग्रेसकडून विद्यमान आमदार प्राणिती शिंदे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीने राहुल गायकवाडांना उतरवले असून आता एमआयएम (AIMIM) पक्षामध्ये उमेदवारीवरून चर्चा सुरू आहे. (Solapur)

गुप्त बैठक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम आणि ‘एमआयएम’ (AIMIM)चा वरिष्ठ पदाधिकारी यांची आज मंगळवारी २ एप्रिलला सकाळी सोलापूरमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक आणि चर्चा झाली. ‘एमआयएम’ने सोलापूरची जागा लढविण्यात रस घेतला असून एकूण चार संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे. (Solapur)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा भाजपाचाच मतदारसंघ – नारायण राणे)

ओवैसी स्वतः उमेदवारीची घोषणा करणार

ही नावांची यादी पक्षप्रमुख ओवैसी यांच्याकडे पाठविण्यात आली असून त्यात रमेश कदम हे एक नाव आहे. कदम यांची आर्थिक बाजू आणि राजकीय अनुभव लक्षात घेता त्यांच्या नावावर एमआयएम (AIMIM) कडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे. ओवैसी हे काही दिवसात एका इफ्तार पार्टीसाठी सोलापूरात येणार असून ते स्वतः या उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. ‘एमआयएम’च्या उमेदवारीमुळे मुस्लिम मते मोठ्या प्रमाणावर फिरू शकतात आणि त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Solapur)

मुलीच्याही वाट्याला तोच अनुभव?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती यांचे वडील, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपाच्या जयसिध्द्धेश्वर स्वामी यांनी १.५८ लाख मतांनी पराभव केला असला तरी त्याचे श्रेय अप्रत्यक्षपणे वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना जाते. स्वामी यांना ५.५४ लाख मते मिळाली तर शिंदे यांना ३.६६ लाख आणि आंबेडकर यांना १.७० लाख मते पडली होती. त्यावेळी वंचित आघाडी आणि ‘एमआयएम’ (AIMIM) यांची युती होती तर या निवडणुकीत दोन्ही पक्षाचे वेगळे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. (Solapur)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.