देशभरात सर्वच ठिकाणी लोकशाही निवडणुकीची धामधूम चालू असताना तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केल्याने ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. कॅश फॉर क्वेरी (Cash For Query) प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपाप्रकरणी महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप तेव्हा मोइत्रा यांनी केला होता. (Cash For Query)
(हेही वाचा – Ramdas Kadam on Anil Parab : माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल; रामदास कदमांचा अनिल परबांना इशारा)
ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने असल्याचा आरोप ; महुआ मोईत्रा
या कारवाईनंतरही ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाकडून महुआ मोइत्रा यंदा पुन्हा लोकसभेचे तिकीट दिले आहे. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील कृष्णानगर (Krishnanagar in West Bengal) मतदारसंघातून मोईत्रा यांना उमेदवारी जाहीर आहे. त्यांच्याकडून निवडणूक प्रचार सुरू असतानाच ईडीने गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. ईडीने केलेली कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने असल्याचा आरोप माहुआ मोईत्रा यांनी केला आहे. (Cash For Query)
(हेही वाचा – Kangana Ranaut : त्यांना लोकशाहीची व्याख्या माहीत नाही; राहुल गांधींच्या टीकेला अभिनेत्री कंगणा रणौतचे प्रत्युत्तर)
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी मे महिन्यात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने ११ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत ही माहिती दिली होती. कॅश फॉर क्वेरी प्रकरणात ०८ डिसेंबर रोजी टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांनी खासदारकीचा दर्जा गमावला. महुआने (Mahua Moitra) बेदखल करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (Cash For Query)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community