- ऋजुता लुकतुके
आयपीएल २०२४ (IPL 2024) ची दिमाखात सुरुवात झाली. १७ व्या हंगामात आतापर्यंत १५ सामने खेळवले गेले आहेत. पहिल्या टप्प्यातील सर्व सामने रोमांचक होत आहेत. पण सामन्यासंदर्भात आयपीएलकडून आता मोठा अपडेट देण्यात आला आहे. दोन सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. राजस्थान (Rajasthan) आणि कोलकाता (Kolkata), गुजरात (Gujarat) आणि दिल्ली (Delhi) यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. आयपीएलने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. (IPL 2024)
(हेही वाचा- Forts in Maharashtra : उन्हाळी सुट्टीत जाणून घ्या छत्रपतींचा इतिहास)
आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR and RR) यांच्यातील सामना १६ एप्रिल रोजी कोलकाता येथे ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. याआधी हा सामना १७ एप्रिल रोजी होणार होता. तर १६ एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी होणार आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. (IPL 2024)
🚨 NEWS 🚨
KKR-RR, GT-DC games rescheduled.
Details 🔽 #TATAIPL https://t.co/O56PJaKKv4
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2024
(हेही वाचा- Palghar Lok Sabha Constituency : उबाठा शिवसेनेकडून पालघरमधून माजी आमदाराला उतरवणार निवडणुकीत?)
रिपोर्ट्सनुसार, १७ एप्रिल रोजी देशभरात रामनवमी उत्साहात साजरी केली जाणार आहे. आशा स्थितीमध्ये सुरक्षा पुरवणं शक्य होणार नाही. पश्चिम बंगाल क्रिकेट असोशिएशनसोबत याबाबत बीसीसीआयचं बोलणेही झाल्याचं समजतेय. त्यामुळेच कोलकात्याचा १७ एप्रिल रोजी होणारा सामना आता १६ एप्रिल रोजी होणार आहे. तर १६ एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी पार पडणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सामन्याचा दिवस बदलण्याचा निर्णय घेतला आहे. (IPL 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community