Women Who Take Loan : पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कर्ज काढण्याचं प्रमाण जास्त

Women Who Take Loan : अगदी वैयक्तिक कर्जं, गृहकर्जं आणि सुवर्णतारण कर्जातही महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे 

148
Women Who Take Loan : पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कर्ज काढण्याचं प्रमाण जास्त
Women Who Take Loan : पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कर्ज काढण्याचं प्रमाण जास्त
  • ऋजुता लुकतुके

अलिकडच्या काळात सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर काम करताना दिसतायेत. त्याचमुळेच असेल कदाचित पण, कर्ज घेणाऱ्या महिलांचं प्रमाणही वाढलं आहे. उद्योग, घर यासाठी पुरुषांपेक्षा आता महिला कर्जं काढत (Women Who Take Loan) आहेत. यात वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज आणि सुवर्णतारण कर्ज अशा सर्व प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे.

(हेही वाचा- A Cow Worth 40 Cr : लिलावात या गाईला मिळाले तब्बल ४० कोटी रुपये )

स्त्रिया या जास्तीत जास्त कर्ज घेत असल्याचं चित्र दिसत आहे. घर खरेदीतही त्यांचा वाटा वाढत आहे. गेल्या काही वर्षांत, कर्ज घेणाऱ्या बँक ग्राहकांमध्ये (Bank customers) महिलांची संख्या वाढली आहे. ही वाढ पर्सनल लोनपासून गोल्ड लोनपर्यंत जवळपास सर्वच वर्गात झाली आहे. सोने कर्ज असो की वैयक्तिक कर्ज (Personal loan) असो किंवा गृहकर्ज (home loan) असो, किरकोळ कर्जामध्ये महिलांचा वाटा सातत्याने वाढत आहे. क्रेडिट ब्युरो CIRF हाय मार्कने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये महिला कर्जदारांबद्दल माहिती सांगण्यात आली आहे. (Women Who Take Loan)

CIRF च्या ताज्या अहवालानुसार, महिलांना गोल्ड लोन घेणे सर्वात जास्त आवडते. अहवालात असे म्हटले आहे की, सुवर्ण कर्जाच्या बाबतीत, एकूण कर्जदारांमध्ये महिलांचा वाटा सर्वाधिक ४४ टक्के आहे. तर शैक्षणिक कर्ज घेणाऱ्यांमध्ये महिलांचा वाटा ३६ टक्के आहे. त्याचप्रमाणे गृहकर्जात महिलांचा वाटा ३३ टक्के आणि मालमत्ता कर्जात ३० टक्के आहे. सर्वात कमी २४ टक्के वाटा व्यवसाय कर्जाचा आहे. विविध प्रकारची कर्जे घेण्यामध्ये महिला आता पूर्वीपेक्षा अधिक पुढे येत असल्याचे अहवालात दिसून आले आहे. गृहकर्ज असो की वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज (gold loan) असो की शैक्षणिक कर्ज, प्रत्येक श्रेणीतील महिलांचा वाटा पूर्वीपेक्षा वाढला आहे. पूर्वी संपूर्ण कर्ज घेणाऱ्या कर्जदारांमध्ये महिलांचा वाटा ३२ टक्के होता. वर्षभरानंतर महिलांचा वाटा आता ३३ टक्के झाला आहे. (Women Who Take Loan)

(हेही वाचा- Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू)

दरम्यान, घरे खरेदी करणाऱ्या महिलांची संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. गृहकर्जाच्या बाबतीत महिला कर्जदारांच्या वाढत्या संख्येचे मुख्य कारण कमी व्याजदर असल्याचे अहवालात म्हटले आहे. बहुतांश बँका महिलांना पुरुषांपेक्षा कमी व्याजदरात गृहकर्ज देतात. CRIF च्या आकडेवारीमध्ये संयुक्त कर्जाचाही समावेश आहे. एक वर्षापूर्वी वैयक्तिक कर्जामध्ये महिलांचा सहभाग १५ टक्के होता, तो आता १६ टक्के झाला आहे. त्याचवेळी, सुवर्ण कर्जामध्ये महिला कर्जदारांचा हिस्सा एक वर्षापूर्वी ४१ टक्क्यांवरून ४३ टक्क्यांवर पोहोचला आहे. या कालावधीत शैक्षणिक कर्जातील त्यांचा हिस्सा ३५ टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र, व्यवसाय कर्जातील कमी वाटा ही चिंतेची बाब आहे. (Women Who Take Loan)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.