Digital Media Revenue : टीव्हीपेक्षा डिजिटल माध्यमांची कमाई वाढली 

Digital Media Revenue : जाहिरातदारांनी टीव्हीपेक्षा डिजिटल माध्यमांना पसंती दिल्याचं चित्र दिसत आहे

191
Digital Media Revenue : टीव्हीपेक्षा डिजिटल माध्यमांची कमाई वाढली 
Digital Media Revenue : टीव्हीपेक्षा डिजिटल माध्यमांची कमाई वाढली 
  • ऋजुता लुकतुके

रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या अभावामुळे लोकांच्या दिनक्रमातही बदल झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच की काय टेलिव्हिजन पेक्षा डिजिटल मीडियावरून (Digital Media Revenue)  माहिती घेण्याकडे लोकांचा अधिक कल असल्याचं बिझनेस चेंबर फिक्कीच्या (Business Chamber FICCI) अहवालातून समोर आलं आहे. २०२४ म्हणजे याच वर्षात कमाईच्या बाबतीत डिजिटल मीडिया (Digital Media Revenue) हे टेलिव्हिजनला (Television) मागे टाकेल असं या अहवालात म्हटलं आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत डिजिटल मीडियाचा महसूल ७५१ अब्ज रुपयांपर्यंत वाढू शकतो, तर टेलिव्हिजनचा महसूल ७१८ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. (Digital Media Revenue)

(हेही वाचा- Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू)

FICCI-EY अहवालानुसार, देशातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राने २०२३ मध्ये ८.१ टक्के इतकी मोठी वाढ दर्शविली आहे. त्यामुळे त्याच्या महसूलात  तब्बल १७३ अब्ज रुपयांची वाढ होऊन तो वाढीसह २.३२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. २०२४ मध्ये यामध्ये १० टक्के वाढीसह एकूण महसूल २.५५ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Digital Media Revenue)

या अहवालानुसार, २०२३ ते २०२६ दरम्यान टेलिव्हिजन महसूल ३.२ टक्क्यांनी वाढेल, तर डिजिटल मीडिया महसुलामध्ये दोन अंकी वाढ होण्याची शक्यता असून तो १३.५ टक्के दराने वाढेल अशी अपेक्षा आहे. २०२६ पर्यंत मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचा महसूल ३.०८ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाईल. अहवालात असे म्हटले आहे की, प्री-कोरोना साथीच्या काळापासून डिजिटल मीडिया क्षेत्राने २१ टक्के वाढ दर्शविली आहे. परंतु टेलिव्हिजन, प्रिंट आणि रेडिओ २०१९ च्या पातळीपेक्षा मागे आहेत. (Digital Media Revenue)

(हेही वाचा- Anil Ambani : अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोलने फेडलं वडिलांचं २,००० कोटींचं कर्ज )

फिक्कीच्या या अहवालानुसार, २०२३ मध्ये टेलिव्हिजन (Television) वगळता मीडिया आणि मनोरंजनाच्या सर्व विभागांमध्ये वाढ झाली आहे. २०२३ मध्ये महसूल १७२ अब्ज रुपयांनी वाढला आहे. टेलिव्हिजनवरील जाहिराती कमी झाल्यामुळे महसुलात घट झाली आहे. तर डिजिटल (Digital) आणि ऑनलाइन गेमिंगसारख्या (Online gaming) नवीन माध्यमांचा २०२३ मध्ये १२२ अब्ज रुपयांचा महसूल आहे. २०१९ मध्ये, मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील नवीन माध्यमांचा वाटा २० टक्के होता, जो २०२४ मध्ये वाढून ३८ टक्के होईल. (Digital Media Revenue)

(हेही वाचा- Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत एका महिलेसह १० नक्षलवादी ठार; शस्त्रास्रे जप्त)

या अहवालानुसार, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये सर्व विभागांमधील टेलिव्हिजनच्या वाढीच्या दरात २ टक्के नकारात्मक वाढ झाली आहे. गेमिंग आणि D2C ब्रँडने जाहिरात खर्च कमी केल्यामुळे टेलिव्हिजन (Television) जाहिरातींमध्ये ६.५ टक्क्यांनी घट झाली. तर डिजिटल जाहिरातींमध्ये १५ टक्के वाढ दिसून आली आहे. डिजिटल सबस्क्रिप्शनच्या महसुलात ९ टक्के वाढ झाली आहे आणि ती ७८ अब्ज रुपयांवर पोहोचली आहे. सलग दोन वर्षे दुहेरी अंकी वाढ दर्शवल्यानंतर, देशाच्या नाममात्र जीडीपी वाढीचा वेग मंदावला आहे आणि तो केवळ ९ टक्के दराने वाढला आहे. ज्यामुळे जाहिरातींच्या महसुलावर परिणाम झाला आहे. (Digital Media Revenue)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.