Maharashtra crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 37 लाखांचा मद्य साठा जप्त

190
Maharashtra crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 37 लाखांचा मद्य साठा जप्त
Maharashtra crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 37 लाखांचा मद्य साठा जप्त

उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Duty) भरारी पथकाने वरळी येथील सासमीरा मार्गावरील सफेलो हॉटेल समोर आणि लोखंडवाला कॉम्लेक्स, (Lokhandwala Comlex) अंधेरी (प) या ठिकाणी परदेशात निर्मित केलेली व दिल्लीतून आयात करून मुंबईत आणलेल्या विविध ब्रँन्डच्या विदेशी मद्याचा साठा (Maharashtra crime) चारचाकी वाहनासह जप्त केला आहे. हा मुद्देमाल एकूण 37 लाख 28 हजार 560 रूपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील आहे.

(हेही वाचा-Women Who Take Loan : पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कर्ज काढण्याचं प्रमाण जास्त )

लोखंडवाला कॉम्लेक्स (Lokhandwala Comlex) येथील गुन्ह्यात (Maharashtra crime) 14 लाख 39 हजार 160 रूपये व वरळी येथील सफेलो हॉटेल समोर येथील गुन्ह्यात 22 लाख 89 हजार 400 रूपये किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमालाचा समावेश आहे. या गुन्ह्यापोटी सतीश शिवलाल पटेल (वय 35) या इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. इसमाने गुन्ह्याची (Maharashtra crime) कबुली दिल्यामुळे आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीदेखील परदेशातून, दिल्लीतून महाराष्ट्रात आयात केलेल्या विविध बँन्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्यांची मुंबईमध्ये विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हे नोंद केले आहेत. (Maharashtra crime)

(हेही वाचा- Digital Media Revenue : टीव्हीपेक्षा डिजिटल माध्यमांची कमाई वाढली )

राज्य उत्पादन शुल्क (State Excise Duty) आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, मुंबई शहर अधीक्षक प्रविण कुमार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे गांभीर्य लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. (Maharashtra crime) ही कारवाई निरीक्षक प्रकाश काळे यांनी केली असून दुय्यम निरीक्षक प्रज्ञा राणे, दुय्यम निरीक्षक लक्ष्मण लांघी तसेच जवान विनोद अहीरे यांनी सहकार्य केले. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री. काळे करीत आहेत, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे. (Maharashtra crime)

हे पहा-

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.