मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेलगत सध्या नक्षल निर्मूलन मोहीम सुरू आहे. या मोहिमेत सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील चकमकीवेळी २ नक्षलवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलाच्या जवांनानी केला आहे. (GONDIA)
मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेलगत मोठा घातपात घडवून आणण्याच्या बेताने दबा धरून बसलेल्या ३५ ते ४० नक्षल आहेत. गोंदिया जिल्ह्याशेजारी मध्य प्रदेशातील बालाघाट येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत २ नक्षलवादी चकमकीत ठार झाले. दोन्ही नक्षलवाद्यांवर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पोलिसांनी 43 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या कारवाई मध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्रसाठाही जप्त केला असून या भागात आणखी काही नक्षलवादी असण्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांनी वर्तवली आहे.
(हेही वाचा – Swaminarayan : स्वामीनारायण देवळात जाता, पण ते स्वामीनारायण कोण होते? )
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्तभागात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आलं आहे. यांच अनुषंगाने गोंदिया जिल्ह्याशेजारील मध्य प्रदेशातील बालाघाट, मंडला जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिमेत बालाघाट जवळील केझरी जंगलात काही नक्षलवादी दबा धरून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, पोलिसांनी त्या दिशेने शोध घेतला असता अचानक पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या अंधाधुंद गोळीबारात पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत नक्षल्यांचा मनसुभा उधळून लावला आहे.
पोलिसांना या भागात शोधमोहीम राबवली असता या घटनास्थळी पोलिसांना दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यामध्ये नक्षलवादी नेता डीव्हीसीएम सजंती उर्फ क्रांती, यावर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये २९ लाख रुपयांचे बक्षीस असून तो मागील अनेक घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच दूसरा नक्षलवादी रघू उर्फ शेर सिंग एसीएम, यावर १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. या दोन्ही मृत नक्षलवाद्यांकडून एक एके- ४७, एक बारा बोअर रायफल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू जप्त करण्यात आलं या चकमकीत आणखी नक्षलवादी मारले गेले असल्याची माहिती आहे. या जंगलात अजूनही शोध मोहीम सुरूच असून आणखी काही नक्षलवादी या परिसरात असल्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांनी वर्तवली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community