भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.
महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून या अनुषंगाने १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात १९ एप्रिल रोजी सकाळी सात वाजल्यापासून १ जून २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोलसाठी प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी ४८ तासांच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा –GONDIA: बालाघाट येथे नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक, लाखोंचे बक्षीस असलेल्या २ नक्षलवाद्यांचा खात्मा )
Join Our WhatsApp Community