Anil Parab : सीआरझेड कायद्याचे उल्लंघन ; दापोलीतील परबांच्या रिसॉर्टवर ‘हातोडा’

हिसाब तो देना पड़ेगा म्हणत किरीट सोमय्याचं ट्वीट व्हायरल

258
Anil Parab सीआरझेड कायद्याचे उल्लंघन ; दापोलीतील परबांच्या रिसॉर्टवर ‘हातोडा’
Anil Parab सीआरझेड कायद्याचे उल्लंघन ; दापोलीतील परबांच्या रिसॉर्टवर ‘हातोडा’

उबाठा (UBT) गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोली येथील समुद्रकिनाऱ्यालगत साई रिसॉर्टवरचे बांधकाम पाडण्यास सुरूवात केली आहे. संबंधित बांधकाम हे अनधिकृत असल्याने ही कारवाई करण्य़ात येत आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबद्दलचा व्हिडिओ एक्स वर टाकला आहे. रिसॉर्टचे पाडकाम करत असतानाच अनिल परब आणि सदानंद कदम (Sadanand Kadam) यांच्यावर फौजदारी कारवाई देखील होणार असल्याचे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. (Anil Parab)

(हेही वाचा – वंचितकडून Vasant More यांच्या उमेदवारीमागे शरद पवार?)

सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप

या प्रकरणी अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या विरोधात दापोली पोलिस स्थानकात १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोलीमधील (Dapoli) मुरूड समुद्रकिनाऱ्यावर अनिल परब यांचे साई रिसॉर्ट (Sai Resort) हॉटेल आहे. या ठिकाणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट बांधताना २०० मीटरच्या आत बांधकाम करून सीआरझेड कायद्याचे (CRZ Act) उल्लंघन केले. समुद्र गिळंकृत केला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. (Anil Parab)

(हेही वाचा – UBT Lok sabha Candidate: उबाठा गटाची दुसरी यादी जाहीर; कल्याणमधून कोण देणार महायुतीला टक्कर)

१० कोटींची मालमत्ता जप्त

जानेवारी महिन्यात ईडीने साई रिसॉर्टची १० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणी सदानंद कदम आणि अनिल परब यांच्याविरोधात मनी लाँडरिंगचाही गुन्हा ईडीने (ED) दाखल केला होता. केंद्रीय पर्यावरण आणि वन खात्याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीने या प्रकरणात हस्तक्षेप केला. या प्रकरणाची चौकशी करत असताना ईडीने सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांना अटक केली होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने कदम यांना जामीन दिला होता. (Anil Parab)

 

(हेही वाचा – Maharashtra crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 37 लाखांचा मद्य साठा जप्त)

भाजपा नेते किरीट सोमय्या लावून धरला मुद्दा 

अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टचा प्रश्न भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लावून धरला होता. या ठिकाणी बेकायदेशी बांधकाम करून गुन्हेगारी कृत्य केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यासंदर्भात तक्रारही केली होती. अखेर या रिसॉर्टचे बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भातील टि्वट सोमय्या यांनी केले आहे. (Anil Parab)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.