Uddhav Thackeray : भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका; उद्धव ठाकरेंचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचे आणि महाविकास आघाडीचे फिसकटले आहे. काही ठिकाणी वंचितने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. बारामतीमध्येही सुप्रिया सुळेंना वंचितने पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

200
Vanchit Bahujan Aghadi : प्रभावहीन वंचित आघाडीने शिवसेना उबाठाचे ३ आणि काँग्रेसचा एक उमेदवार पाडला

आमच्या दोघांच्याही आजोबांचे ऋणानुबंध होते. आम्ही हुकूमशाहीविरोधात एकत्र आलो होतो. आज आपल जमलं नसेल पण भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका काही वेळा काही गोष्टी होत नाहीत असे आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना केले. प्रकाश आंबेडकरांची वंचित महाविकास आघाडीसोबत येऊ शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात शिंदेंच्या शिवसेनेतील कोणालाही आपल्या पक्षात घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजू शेट्टी हे मशाल चिन्हावर लढण्यास तयार नव्हते म्हणून आम्हाला हातकणंगलेत उमेदवार द्यावा लागला असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. (Uddhav Thackeray)

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचे आणि महाविकास आघाडीचे फिसकटले आहे. काही ठिकाणी वंचितने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. बारामतीमध्येही सुप्रिया सुळेंना वंचितने पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आज आपलं जमलं नसेल. पण प्रकाशजी भविष्यात आपलं जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना केलं आहे. आंबेडकर यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आमच्या दोघांच्या आजोबांचे ऋणानुबंध होते. आपण हुकूमशाहीविरुद्ध एकत्र आलो होतो. आज आपलं जमलं नसेल पण भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका. काही वेळा काही गोष्टी होत नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray)

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यात तथ्य नव्हतं. आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिलं असतं. पण आम्ही त्यांच्याविरोधात काही बोललो नाही. बोलणार नाही. त्यांनी माझ्यावर कितीही टीका केली तरी मी त्यांच्याविरोधात बोलणार नाही. त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे. ते काहीही बोलले तरी मी त्यांच्याविरोधात बोलणार नाही. कारण आमच्या दोघांचे आजोबा समाजसुधारणेसाठी एकत्र आले होते. संविधान धोक्यात आले असताना आपण एकत्र येऊन आपली ताकद दाखवायला हवी होती. पण मी माझ्या पक्षातील लोकांना त्यांच्याविरोधात बोलू नका असे सांगितले असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. राजू शेट्टी यांच्यासोबतची बोलणी फिसकटली असे नाही. कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. मात्र शाहू महाराजांचा मान म्हणून कोल्हापूरची जागा आम्ही काँग्रेसला सोडली. दुसरीही जागा सोडली असती तर जो हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज झाला असता. त्यामुळे आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – S. Jaishankar : भारताला UNSC मध्ये निश्चितच कायमस्वरूपी सदस्यत्व मिळेल; एस. जयशंकर यांचे आश्वासक विधान)

उन्मेष पाटील ठाकरे गटात

जळगावचे भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपाला रामराम करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मला उमेदवारी नाकारली म्हणून ही भूमिका घेतलेली नाही. राजकारणात, समाजकारणात कार्यकर्त्यांना मानसन्मान नको, पण त्याचा स्वाभिमान जर सांभाळला जात नसेल तो जर दुखावला जात असेल, अवहेलना केली जात असेल तर लाचार होऊन त्याठिकणी समाजकारण, राजकारण होऊ शकत नाही, सज्जनशक्ती पुढे आली पाहिजे, दुर्जनशक्ती पुढे आली तर आम्हाला बोलण्याचा अधिकार राहात नाही असे उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी स्पष्ट केले. स्वाभिमानाने लढणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा अनुयायी होणार असल्याचे उन्मेष पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपाने जळगावमधून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट न देता स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज झाले होते. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.