IPL 2024, Siddhartha Dismisses Kohli : कोहलीला बाद करशील का? या प्रश्नावर तो ‘हो’ म्हणाला आणि…

मणीमारन सिद्धार्थचा विराट कोहली हा पहिला आयपीएल बळी ठरला

204
IPL 2024, Siddhartha Dismisses Kohli : कोहलीला बाद करशील का? या प्रश्नावर तो ‘हो’ म्हणाला आणि…
IPL 2024, Siddhartha Dismisses Kohli : कोहलीला बाद करशील का? या प्रश्नावर तो ‘हो’ म्हणाला आणि…
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या (IPL 2024) या आठवड्यात रियान पराग आणि मयंक यादव हे आपल्या बॅट आणि चेंडूंमुळे गाजतायत. पण, आणखी एका मुलाची चर्चाही या आठवड्यात झाली, ती म्हणजे विराट कोहलीला (Virat Kohli) स्वस्तात बाद करणाऱ्या लखनौ सुपरजायंट्सच्या मणीमारन सिद्धार्थची. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात युवा गोलंदाज सिद्धार्थला त्याचे प्रशिक्षक जस्टिन लँगर सामन्याच्या आदल्या दिवशी म्हणाले होते, ‘तुला संधी दिली तर मला विराटचा बळी मिळवून देशील का?’ सिद्धार्थ म्हणाला, ‘हो सर!’ आणि तिथेच त्याला संघात जागाही मिळाली.

विशेष म्हणजे त्याने दिलेलं वचन पाळलंही. विराट कोहलीने तेव्हा धडाक्यात सुरुवात केली होती. आणि १५ चेंडूंत २२ धावा करताना त्याने २ चौकार आणि एक सरळ षटकार ठोकला होता. पण, सिद्धार्थने वेगात केलेला बदल विराट ओळखू शकला नाही. चेंडू कमी वेगाने आला आणि टप्पा पडल्यानंतर थोडा वळलाही. विराटने आधीच बॅट हवेत उचलली होती. त्यामुळे टायमिंग चुकलं. आणि विराट देवदत्त पड्डिकलकडे झेल देऊन बाद झाला. विराट मागून बंगळुरूच्या इतर फलंदाजांचीही तंबूत परतण्याची रीघ लागली. आणि अखेर ३० धावांनी संघाचा पराभवही झाला.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: ६५ गावांचा मतदानावर बहिष्कार; कारणे वाचा सविस्तर…)

आता लखनौ सुपरजायंट्स संघाने या विजयानंतर ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात जस्टिन लँगर यांनीच सिद्धार्थ बरोबरचा हा प्रसंग सांगितला आहे.

विराट कोहलीचा (Virat Kohli) बळी कुठल्याही प्रकारच्या आणि कुठल्याही स्तरावरील क्रिकेटमध्ये मानाची आहे. आणि युवा गोलंदाजाला पहिल्याच प्रयत्नांत विराटचा बळी मिळाला तर त्यांना तो लक्षात राहीलच. आयपीएलमध्ये (IPL 2024) एकूण १० गोलंदाजांना आपला पहिला बळी म्हणून विराटचा बळी मिळाला आहे आणि यात अगदी जसप्रीत बुमराचाही समावेश आहे.

इतर नऊ गोलंदाज आहेत अशोक दिंडा, आशिष नेहरा, एबी मॉर्केल, चैतन्य नंदा, डज ब्रेसवेल, मिचेल मॅकलेगन, हरप्रीत ब्रार, डेवाल़्ड ब्रेव्हिस आणि आता मणीमारन सिद्धार्थ. त्या सामन्यात पहिली फलंदाजी करत लखनौ सुपरजायंट्‌स संघाने १८१ धावा केल्या होत्या. आणि बंगळुरूला त्यांच्या संघाने १५३ धावांत गुंडाळत २८ धावांनी विजय मिळवला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.