Gaurav Vallabh: काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ यांचा राजीनामा; देव, देश आणि धर्मासाठी पक्षत्यागाची घोषणा

आपल्या राजीनाम्यासंदर्भात गौरव वल्लभ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे.

251
Lok Sabha Election : गौरव वल्लभ भाजपावासी, काँग्रेसवर सनातन विरोधी असल्याचा आरोप

काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ (Gaurav Vallabh) यांनी पक्षाच्या सर्व पदांवरून राजीनामा दिला आहे. वल्लभ यांनी गुरुवारी, (२५ एप्रिल) ट्विटरवर (X) पोस्ट करत ही माहिती दिली आहे. सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही. तसेच देशाची संपत्ती निर्माण करण्यांविरोध बोलू शकत नाही त्यामुळे राजीनामा देत असल्याचे गौरव वल्लभ यांनी म्हटले आहे.

आपल्या राजीनाम्यासंदर्भात गौरव वल्लभ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. पत्रात नमूद केल्यानुसार, काँग्रेस पक्षाचा ग्राऊंड लेवल संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या विषयावर मला खूप काही बोलायचे आहे; परंतु इतरांना दुखावण्याचा मानस नसल्यामुळे आपण गप्प आहोत. तरी सत्य लपवणे अयोग्य असल्यामुळे पत्राद्वारे आपली कैफियत मांडत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. ‘मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे. पक्षाने मला राष्ट्रीय प्रवक्ता बनवले तेव्हा मी माझे मत ठामपणे मांडले, मात्र गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या भूमिकेमुळे मी अस्वस्थ होतो. मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा मला वाटले की हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. येथे तरुण, बुद्धिजीवी लोकांच्या विचारांना महत्त्व दिले जाते. मात्र गेल्या काही वर्षात माझ्या लक्षात आले की पक्षाचे सध्याचे स्वरूप तरुणांना नव्या कल्पनांसह सामावून घेण्यास सक्षम नाही. पक्षाचा ग्राऊंड लेव्हल वर संपर्क तुटला आहे. नव्या भारताच्या अपेक्षा तुम्ही समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे ना पक्ष सत्तेत येऊ शकला आहे ना विरोधी भूमिका ठामपणे पार पाडत आहे. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निराश करत असल्याचे गौरव वल्लभ यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Bombshell Found: हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले)

पक्षाची वाटचाल चुकीच्या दिशेने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे आपण जातीवर आधारित जनगणनेबद्दल बोलतो आणि दुसरीकडे संपूर्ण हिंदू समाजाचा विरोध होताना दिसत आहे. या कार्यशैलीमुळे पक्षाच्या लोकांमध्ये विशिष्ट धर्माचे समर्थक असल्याची प्रतिमा निर्माण होते, असे गौरव वल्लभ यांनी म्हंटले आहे. काँग्रसने रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून स्वत:ला दूर ठेवले, यावर देखील गौरव वल्लभ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मी जन्माने हिंदू आहे आणि व्यवसायाने शिक्षक आहे. पक्षाच्या या भूमिकेने मला अस्वस्थ केले. पक्ष आणि आघाडीशी संबंधित अनेक लोक सनातनच्या विरोधात बोलतात आणि त्यावर पक्ष गप्प बसतो. एक प्रकारे, मौन संमती देण्यासारखे आहे असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलेय.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.