Manonmanyam Sundaram Pillai : तमिळनाडूचे राज्यगीत कोणी रचले ठाऊक आहे का ?

253
Manonmanyam Sundaram Pillai : तमिळनाडूचे राज्यगीत कोणी रचले ठाऊक आहे का ?
Manonmanyam Sundaram Pillai : तमिळनाडूचे राज्यगीत कोणी रचले ठाऊक आहे का ?

मनोन्मन्यम सुंदरम पिल्लई पी. सुंदरम हे भारतीय विद्वान होते. त्यांनी मनोन्मन्यम हे प्रसिद्ध तमिळ नाटक लिहिले होते. तसेच ’तमिळ ताय वाळत्तु’ (तमिळ देवीस आवाहन) हे तमिळनाडू राज्यातील “तमिळनाडू शासनाचे राज्यगीत” मनोन्मन्यम यांनी लिहिले होते. राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यक्रमाचा आरंभ ह्याच गाण्याने होतो व सांगता राष्ट्रगीताने होते.तमिळ भाषक तमिळ भाषेस आईचा दर्जा देतात व त्या अर्थाने तमिळ देवता किंवा देवीची मूर्तीस्वरूपात पूजा देखील करण्यात येते. या देवीला तमिळअन्नै (अर्थ:तमिळ आई) असे म्हणतात.

(हेही वाचा – Attack By Muslim Mob: नाशिकमध्ये महंत अनिकेतशास्त्री महाराजांवर मुस्लिम समाजाकडून हल्ला)

या गीताचे बोल

नीरानुम् कडल् उडुत्त् निल मडनदैक् केळिलोळुकुम्
सीरानुम् वदनमेनद् दिकळ्परदक् कण्डमिदिल्
तेक्कणमुम् अदिर्सिरन्द द्राविड नल् तिरुनाडुम्
दक्कसिरु बिरैनुद्लुम तरित्तनरुम्
अद्दिलक वासनैपोल् अनैन्दुलकुम् इन्बमुर
ऍत्तिसैयुम् पुगळ्मणक्क् इरुन्दु पेरुम् तमिळणंगे!
तमिळणंगे !
निन् सिरिळमैद् दिरम्वियन्दु
सेयल् मरन्दु वाळत्तदुमे !
वाळत्तदुमे !
वाळत्तदुमे !

सुंदरम यांचा जन्म ४ एप्रिल १९५५ रोजी झाला. महाराजा कॉलेजमधील फिलॉसॉफी आणि इंग्रजीचे स्कॉटिश प्रोफेसर असलेले हार्वे यांच्याबद्दल सुंदरम यांच्या मनात आदर होता. म्हणूनच त्यांनी आपले मनोन्मन्यम हे नाटक हार्वे यांना समर्पित केले होते. तसेच त्यांच्या फार्महाऊसला त्यांच्या नावाने ठेवले. त्या दोघांनी मिळून “Some Early Sovereigns of Travancore” हे पुस्तक देखील लिहिले.

१८८५ मध्ये, त्यांनी चथिरा सौगीरागम हे पुस्तक प्रकाशित केले. त्यांनी १८९१ मध्ये त्यांनी मनोन्मन्यम हे नाटक लिहिले आणि प्रकाशित केले. त्याच वर्षी ते मद्रास विद्यापीठाचे (FMU) सदस्य फेलो बनले. १८९७ मध्ये ते रॉयल एशियाटिक सोसायटी (MRAS) चे सदस्य झाले. “मनोन्मन्यम सुंदरम युनिव्हर्सिटी”चे (Manonmaniam Sundaram University) नाव त्यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. १९४२ मध्ये त्यांच्या मनोन्मन्यम या नाटकावर एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. २६ एप्रिल १८९७ मध्ये डायबिटीसमुळे त्यांचे निधन झाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.